नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून सगळ्यांच्या नजरा क्रिकेटकडे लागल्या आहेत. कारण टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात कायम संघर्षाच्या मॅच झाल्या आहेत. जगभरातील चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत. येत्या रविवारी क्रिकेटचा हा सामना होणार आहे. त्याची उत्सुकता सुद्धा WWE चा ‘द रॉक’ याला सुध्दा लागली आहे.
मेलबर्नमध्ये होणाऱ्या मॅचेसच्या तिकीट सुद्धा सगळ्या विक्री झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही समर्थक मॅचच्यावेळी दिसतील. द रॉकने एक वीस सेकंदाचा व्हिडीओ तयार केला आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, जेव्हा दोन मोठे प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडणार असतात. तेव्हा संपुर्ण जग थांबतं. विशेष म्हणजे सामन्य क्रिकेट सामन्यापेक्षा हे खूप काही आहे. आता भारत आणि पाकिस्तानला भिडण्याची वेळ आली आहे असा मेसेज दिला आहे.
.@TheRock is #ReadyForT20WC and will kickstart the #GreatestRivalry in style on 23rd Oct, 7 AM onwards on #CricketLive#IndvPak | #BelieveInBlue | ICC Men’s #T20WorldCup | #Blackadam pic.twitter.com/KawbyLbNGM
— Star Sports (@StarSportsIndia) October 18, 2022
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
स्टँडबाय खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.
स्टँडबाय खेळाडू : मोहम्मद हरीस, उस्मान कादिर आणि शाहनवाज दहनी.