मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) संधी मिळूनही ऋषभ पंतला (Rishabh Pant) टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे न्यूझिलंड (NZ) दौऱ्यात सुध्दा त्याला संधी देण्यात आली होती. परंतु तिथंही त्याने निराशाजनक कामगिरी केली. सध्या टीम इंडियाचा बांगलादेश दौरा सुरु आहे. सुरु असलेल्या कसोटी सामन्यात त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं आहे.
पाकिस्तान टीमचा खेळाडू सलमान बट याने ऋषभ पंत याच्यावरती जोरदार टीका केली आहे. सलमान बटने पंतला अधिक लठ्ठ असल्याचं सुद्ध म्हटलं आहे. त्याला काही शॉट खेळताना अडचण येत आहे, समजा तो अधिक फीट राहिला असता, तर त्याला ते शॉट खेळताना कसल्याही प्रकारची अडचण आली नसती असं सलमान बट म्हणाला.
सलमान बट त्याच्या यु्टयूब चॅनेलवरती ज्यावेळी बोलत होता. त्यावेळी त्याने सांगितले की,ऋषभ पंत याचं वजन अधिक आहे. त्यामुळे त्याला खेळताना अधिक अडचणी येत आहेत. प्रत्येकवेळी तो खेळत असताना नवीन कायतरी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला त्याची खेळी अधिक आवडते.
बीसीसीआयकडून टीममध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. ज्या खेळाडूची कामगिरी खराब होईल अशी खेळाडूंना डिच्चू देण्यात येणार आहे.