मेलबर्न : पाकिस्तान टीमचा (Pakistan Team) पराभव झाल्यापासून जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांनी (Cricket Fan)पाकिस्तानच्या खेळाडूंची सोशल मीडियावर अधिक खिल्ली उडविली आहे. रोज नवे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) येत आहेत. त्याची अनेकजण मजा घेत असल्याचे पाहायला मिळते. झिम्बाब्वेच्या (ZIM) चाहत्यांनी सुद्धा पाकिस्तानच्या खेळाडूंची खिल्ली उडविली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या मोमीन साकीब याची खिल्ली उडविल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘मारो मुझे मारो’ या वाक्यामुळे अधिक प्रसिध्दीस आलेल्या मोमीन साकीब याची खिल्ली एका झिम्बाब्वेच्या चाहत्याने उडविली आहे. पाकिस्तान आणि झिम्बाब्वेची मॅच झाली त्यानंतरचा हा व्हिडीओ आहे. ज्यावेळी मोमीन साकीब झिम्बाब्वेच्या चाहत्याची भेट झाली. त्यावेळी झिम्बाब्वेच्या चाहत्याने “तुम हारे तुम हारे” असं म्हटलं आहे.
त्याच व्हिडीओमध्ये मोमीन साकीबने “हार के जितने बालो को बाजीगर कहते है” असं म्हटलं आहे. त्यानंतरही झिम्बाब्वेच्या चाहत्याने चिडवलं आहे.
पाकिस्तान टीमचा पराभव झाल्यापासून खेळाडूंवरती पाकिस्तानची माजी खेळाडूंनी सडकून टीका केली आहे. त्यामध्ये वसीम अक्रम, शोएब मलिक, वकार युनूस, मिसबाह यांचा समावेश आहे. शोएब मलिक पाकिस्तान टीममध्ये असायला हवा होता असं देखील वसीमने म्हटलं आहे.