Yusuf Pathan | WT20 च्या फायनलमध्ये सेहवागला दुखापत, ऐनवेळी युसूफला संधी, आल्या आल्या षटकार ठोकला, पठाणचा प्रवास

| Updated on: Feb 26, 2021 | 7:30 PM

युसूफ पठाणने (Yusuf Pathan) 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यातून पदार्पण केलं होतं.

Yusuf Pathan | WT20 च्या फायनलमध्ये सेहवागला दुखापत, ऐनवेळी युसूफला संधी, आल्या आल्या षटकार ठोकला, पठाणचा प्रवास
युसूफ पठाणने 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यातून पदार्पण केलं होतं.
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा तडाखेदार फलंदाज युसूफ पठाणने (Yusuf Pathan) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. यूसुफने टीम इंडियाचं वनडे आणि टी 20 मध्ये प्रतिनिधित्व केलं. युसूफ टीम इंडियाच्या 2007 मधील टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. तसेच 2011 मधील वर्ल्ड कप विजेत्या चमूचा एक हिस्सा होता.ही युसूफसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. पण युसूफसाठी टी 20 पदार्पण हे फार खास राहिलं आहे. हे पदार्पण युसूफसाठी अविस्मरणीय असंच आहे. नक्की तेव्हा काय घडलं होतं, युसूफला टी 20 डेब्यूची संधी कशी मिळाली, यामागचा रंजक किस्सा आपण युसूफच्या निवृत्तीच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत. (Yusuf Pathan made his T20 debut against Pakistan in the 2007 World Cup final)

अविस्मरणीय टी 20 पदार्पण

क्रिकेटमध्ये स्पर्धा इतकी आहे की नव्या खेळाडूंना संधी देण्यासाठी अनुभवी खेळाडूंना त्या सामन्यापुरता ब्रेक घ्यावा लागतो. किंवा दुबळ्या संघाविरोधात नव्या दमाच्या खेळाडूला पदार्पणाची संधी दिले जाते. पण युसूफसोबत जे घडलं ते तो स्वत: कधीच विसरु शकणार नाही. घडलं ही तसंच.

गोष्ट आहे 2007 ची. पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीत सामना खेळवण्यात आला. हा सामना टाय झाला. त्यामुळे  बॉल आऊटने सामन्याचा निकाल लावण्यात आला. त्यानंतर काही सामने जिंकत भारताने बाद फेरीत धडक मारली. बाद सामन्यातही टीम इंडियाने चांगली खेळी केली. सेमी फायनलमध्ये कांगारुंना पराभवाची धुळ चारत टीम इंडिया अंतिम सामन्यात पोहचली.

अंतिम सामन्यात गाठ पडली ती पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध. पाकिस्तान विरुद्ध सामना अंतिम सामना असल्याने क्रिकेट चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणीच ठरली. सर्व चाहते या सामन्यासाठी उत्सुक होते.

पण सामन्याआधी  ऐनवेळस टीम इंडियाचा हुकमाचा एक्का सलामीवीर वीरेंद्र सेहवाग दुखापतग्रस्त झाला. सेहवागने या बाबतची माहिती टीम मॅनेजमेंटला दिली. यामुळे मोक्याच्या क्षणी युसूफला चक्क वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातून टी 20 पदार्पण करण्याची संधी मिळाली. एका कार्यक्रमात वीरेंद्र सेहवाग सहभागी झाला होता. या दरम्यान त्याने हा किस्सा सांगितला होता.

या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. युसूफ गौतम गंभीरसोबत ओपनिंगसाठी मैदानात आला. पहिलाच सामना तो ही वर्ल्ड कप फायनलचा असल्याने युसूफवर दबाव होता. मात्र गंभीरने त्याला विश्वास दिला. दोघांनी टीम इंडियासाठी योग्य सुरुवात केली. दोघांनी 25 धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान युसूफने आपल्या आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवलं. युसूफने या सामन्यात 8 चेंडूत 1 सिक्स आणि 1 चौकारासह 15 धावा केल्या. त्यानंतर युसूफला कॅप्टन धोनीने बोलिंगचीही संधी दिली. या सामन्यात 1 ओव्हर टाकण्याची संधी मिळाली. त्याने या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या.

युसूफची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

युसूफने टी 20 आणि वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध पदार्पण केलं. युसूफने टी 20 मध्ये एकूण 22 सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. यामध्ये त्याने 146.58 स्ट्राईक रेटने 236 धावा केल्या. तसेच 13 विकेट्सही मिळवल्या.

तसेच एकूण 57 वनडेमध्ये त्याने 2 शतक आणि 3 अर्धशतकांसह 810 धावा केल्या. 123 ही त्याची वनडेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. सोबतच त्याने 33 बळीही घेतल्या.

संबंधित बातम्या :

Yusuf Pathan Retirement : तडाखेबाज फलंदाज युसूफ पठाणचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

(Yusuf Pathan made his T20 debut against Pakistan in the 2007 World Cup final)