मुंबई : नुकतीच रोड सेफ्टी वर्ल्ड टी ट्वेन्टी सिरीज ( Road Safety World T20 Series) पार पडली. या सिरीजमध्ये आपल्या बॅटिंगने युवराज सिंहने (Yuvraj Singh) ‘टायगर अभी जिंदा’ असल्याचं दाखवून दिलं. आपल्या बॅटिंगने पुन्हा प्रतिस्पर्ध्यांवर हुकमत जागवत चौकार षटकारांचा पाऊस पाडला. अगदी एका ओव्हरमध्ये चार षटकार लगावून इंग्लंडविरुद्ध लागोपाठ 6 षटकारांची आठवण संबंध जगाला करुन दिली. तोच युवराज सिंह आता चर्चेत आला तो त्याच्या नव्या लुकसाठी…! (Yuvraj Singh New look ) साहजिकच युवराजच्या नव्या लुकवर भारतीय क्रिकेटपटूंना काही कमेंट केल्या आहेत. Yuvraj Singh New look reaction Jadeja harbhajan And Shikhar Dhawar
युवराजला स्टाईलिश लुक करणं पसंत आहे. नव्या वाढवलेल्या केसांच्या स्टाईलने युवराज चर्चेत आला आहे. महेंद्रसिंग धोनीचे जसे मोठे केस होते तश्या प्रकारे युवराजने केस वाढवलेले दिसत आहेत. त्याची ही नवी हेअर स्टाईल अनेक नेटकऱ्यांना भावली आहे. तर काही क्रिकेट खेळाडूंनी युवराज सिंहची फिरकी घेतलीय.
युवराजने नव्या हेअर स्टाईल लुकचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या फोटोमध्ये त्याचे केस लांब दिसत आहेत. याआधी सगळ्यांनी युवराज अगदी छोट्या केसांमध्ये पाहिलं आहे. मात्र इतक्या वर्षांत पहिल्यांदाच सगळे जण युवराजला मोठ्या वाढलेल्या केसांमध्ये पाहत आहेत.
युवराजने नव्या हेअर स्टाईल लुकचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्यानंतर रविंद्र जाडेजाने कमेंट करत युवी पा काय होते आणि काय झाले…?, अशी मजेशीर कमेंट केली आहे. शिखर धवनने कमेंट करत बादशहा वाटत आहात, असं म्हटलंय. तर दुसरीकडे हरभजनने वेगळीच कमेंट करत “सिरी पाजी का स्टाईल” अशी कमेंट केली आहे.
हे ही वाचा :
3 बॅट्समन 99 रन्सवर आऊट, नर्व्हस नाईन्टीजचा ‘नकोसा रेकॉर्ड’!, पाहा एकाच मॅचमध्ये काय काय घडलं…?