टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगची (Yuvraj Singh) सध्या अधिक चर्चा आहे. कारण मागच्या दोन दिवसांपुर्वी त्याने मारलेल्या सहा षटकाराला पंधरा वर्षे पुर्ण झाली. तो व्हिडीओ (video) त्याने त्याच्या मुलासोबत टिव्हीवरती पाहिला. तसेच कॅप्शनमध्ये त्यांने असा सोबती मला मिळाला नसता असं म्हटलं आहे. तो व्हिडीओ युवराज सिंगने ट्विटने केला होता. विशेष म्हणजे तो व्हिडीओ व्हायरल (viral video) सुद्धा झाला होता.
युवराज सिंगची पत्नी हेजल कीच ही त्यांच्या मुलाला घेऊन प्रवास करीत आहे. त्यावेळी त्यांच्या मुलाला झोप आली आहे, झोपत असताना तो शेजारी चाललेल्या कालव्यामुळे जागा झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील आहे. युवराज सिंगची पत्नी बाहेर जात असताना हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्यावेळी व्हिडीओ काढण्यात आला त्यावेळी हेजल कीच सुद्धा हसत आहे.
टीम इंडियाचे अनेक माजी खेळाडू सद्या क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 मध्ये जगातील अनेक माजी खेळाडू सहभागी झाले आहेत.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 मध्ये टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्याचे हॉटेलमधील अनेक चांगले व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले आहेत. सुरेश रैना आणि इरफान पठाणने गाणं गायलेल्या व्हिडीओ अधिक लाईक मिळाल्या.