मुंबई : गेल्या दोन-तीन वर्षांपासून भारतीय संघाची व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये दोन फिरकीपटूंच्या मदतीने घोडदौड सुरु आहे. त्यापैकी पहिला आहे कुलदीप यादव तर दुसरा लेग स्पिनर युजवेंद्र चहल. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा व्हाईट बॉल क्रिकेटच्या बाबतीत या दोन फिरकीपटूंवर मोठा विश्वास आहे. कुलदीप-चहल जोडीपैकी युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाकडून खेळतो. आयपीएलमध्ये विराटच्या संघाच्या फिरकीचा विभाग चहल सांभाळतो असं म्हणू शकतो, कारण आयपीएलमध्ये चहलने बऱ्याचदा बँगलोरच्या संघाला मोठे विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चहल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसा प्रभावी ठरलेला नाही. त्यामुळे कमबॅकसाठी चहलकडे आयपीएल 2021 या स्पर्धेचा बेस्ट पर्याय आहे.
चहलने आतापर्यंत 54 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. या 54 सामन्यांमध्ये त्याने 92 विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत. 42 धावा देत 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 48 टी-20 सामन्यांमध्ये चहलला भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. त्यात त्याने 62 विकेट्स मिळवल्या आहेत. 25 धावा देत 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर आयपीएलमध्ये चहल आतापर्यंत 99 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 121 विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत. 25 धावात 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
फॉरमॅट
|
सामने
|
डाव
|
चेंडू
|
निर्धाव
षटकं |
धावा
|
विकेट्स
|
BB
|
Econ
|
Avg
|
SR
|
4W
|
5W
|
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
एकदिवसीय
2016–
|
54
|
53
|
2893
|
13
|
2511
|
92
|
6/42
|
5.20
|
27.3
|
31.4
|
2
|
2
|
टी-20
2016–
|
48
|
48
|
1125
|
1
|
1575
|
62
|
6/25
|
8.40
|
25.4
|
18.1
|
2
|
1
|
आयपीएल
2013–
|
99
|
98
|
2130
|
3
|
2723
|
121
|
4/25
|
7.67
|
22.5
|
17.6
|
2
|
0
|
संबंधित बातम्या
Virat Kohli IPL 2021 RCB Team Player : रनमशीन विराट कोहली आयपीएलमध्येही अव्वल
(Yuzvendra Chahal IPL 2021 RCB Team Player Profile Stats ICC Ranking Photos Videos Indian Cricket Players Latest News in Marathi)