मुंबई : हिवाळा संपून आता उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे एसीची आठवण आल्याशिवाय राहात नाही. पण प्रत्येकाचं एसी विकत घेण्याचं बजेट असतंच असं नाही. त्यामुळे पंख्यावरच उन्हाळ्याचे दिवस काढावे लागतात. पण तुमची इच्छा एसी घेण्याची असेल तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलच्या माध्यमातून स्वस्तात एसी घेण्याची संधी आहे. जर तुम्ही स्प्लीट एसी घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट सेलमध्ये 1.5 टन एसीच्या मॉडेलवर 46 टक्के सवलत मिळत आहे. तुमच्यासाठी ही ऑफर सर्वात बेस्ट ठरेल. फक्त 38 रुपये प्रतिदिवस खर्च करून तुम्ही एसी विकत घेऊ शकता. चला जाणून घेऊयात या ऑफरबाबत
Whirlpool एसीमध्ये तुम्हाला टर्बो कूल, सेल्फ क्लीन, हिडन डिस्प्ले आणि स्लीक डिझाईनसह काही फीचर्स मिळतील. कन्व्हर्टेबल एसीच्या माध्यमातून 0.9 टन, 1.1 टन, 1.3 टन आणि 1.5 वर चालवू शकतो. फ्लिपकार्ट सेलमध्ये या एसीवर 46 टक्के सवलत मिळत आहे. या एसीची किंमत 62000 रुपये इतकी आहे. पण सवलतीत 32 हजार 990 रुपयांना मिळते. 46 टक्क्यांसह या प्रोडक्टवर आणखी काही ऑफर्स देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुमच्या पैशांची बचत होईल.
ही एसी तुम्ही 3666 रुपये प्रति महिना किंवा 1144 रुपयांच्या प्रतिमहिना हफ्त्यावर घेऊ शकता. जर तुम्हाला 1144 रुपये प्रतिमहिना हफ्त्यावर एसी घ्यायची असेल तर एक्सिस बँकेचा पर्याय निवडावा लागेल. या अंतर्गत तुम्हाला 36 महिन्यांचा प्लान मिळेल. 1144 प्रतिमहिना म्हणजेच प्रत्येक दिवसाला तुम्ही 38.13 रुपये खर्च येईल.
फ्लिपकार् सेलमध्ये व्होल्टास एसीवर देखील सवलत देण्यात आली आहे. वरील मॉडेलवर 44 टक्के सवलत दिल्याने या एसीची किंमत 34999 रुपये इतकी होते. या एसीवरही विना व्याज ईएमआय भरण्याची सोय आहे. जर ग्राहकांनी ईएमआयचा पर्याय निवडला, तर एक्सिस बँकेकडून सुविधा मिळते. या प्लान अंतर्गत 36 महिन्यांचा पर्याय दिला असून महिना 1214 रुपये खर्च येईल. म्हणजेच दिवसाला 40.46 इतके रुपये खर्च करावे लागतील.
आयसीआयसीआय आणि एक्सिस बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रान्सक्शनवर 2500 रुपायांची सूट दिली जात आहे. दुसरीकडे पीएनबी क्रेडिट कार्ड आणि येस बँकेचं क्रेडिट कार्डने घेतल्यास 10 टक्के सवलत मिळेल. म्हणजेच 1500 रुपयांपर्यंत सूट मिळेल.