मुंबई : गुगलने 2018 मध्ये टॉप ट्रेडिंग असलेल्या कारची यादी जाहीर केली आहे. यामध्ये वेग-वेगळ्या कंपनीच्या कारचा समावेश आहे. कोणती गाडी सर्वात जास्त सर्च करण्यात आली त्याची यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये महिंद्रा, होंडा, मारुती, फोर्ड आणि बीएमड्ब्ल्यूचा यादीत समावेश आहे.
भारतीयांना होंडा अमेजचा नवीन मॉडेल खूप आवडलेला आहे. विशेष म्हणजे यामध्ये सीवीटी गिअरबॉक्ससोबत डीझल कारची सुविधा देण्यात आली आहे. 5.87 लाख ते 9.11 लाखांमध्ये या गाडीची किंमत आहे.
गुगल ट्रेंडच्या दुसऱ्या नंबरवर महिंद्रा मराज्जो आहे. डबल विशबोन सेटअप आणि समोर असलेल्या आरामदायक केबीनची सुविधा दिल्यामुळे या गाडीने इनोव्हा आणि टोयोटाला मागे सोडले आहे. या गाडीची किंमत 9.99 लाख ते 13.90 लाख आहे.
टोयोटा यारिस भारतात एप्रिल 2018 मध्ये लाँच झाली. यामध्ये सहा एअरबॅग, प्रोजेक्टर हेड लॅम्प, पार्किंग सेंसरची सुविधा दिल्यामुळे लोकांच्या जास्त पसंतीस उतरली. तसेच यामध्ये सीवीटीचा विकल्पही दिला आहे. या गाडीची किंमत 9.29 लाख ते 14.7 लाख आहे.
ह्युंदाई सॅन्ट्रोही इंटरनेटवर हीट ठरली आहे. आपल्या जुन्या मॉडेलमुळे ह्युंदाई सॅन्ट्रोला जास्त प्रमाणात गुगलवर सर्च करण्यात आले. या गाडीची किंमत 3.90 ते 5.65 लाख आहे.
फिगो लाँच झाल्याच्या आठ वर्षानंतरही फोर्ड फ्री स्टाईलवर लोकांनी पसंती दिली आहे. या गाडीचे रिव्ह्यू चांगले असल्यामुळे गाडीची इंटरनेटवर लोकप्रियता चांगली राहिली. फिगोची किंमत 5.23 ते 7.93 लाख आहे.
मारुती सुझूकी अर्टीगाने लाँच झाल्यानंतर इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. मात्र जेवढ्या लवकर लोकप्रिय झाली तेवढ्या लवकर गाडी गायब झाली. यामध्ये पावरफुल डिझलच्या कमतरतेमुळे लोक निराश झाले. पण या वर्षात जास्त सर्चिंगमध्ये अर्टिगा सहाव्या क्रमांकावर आहे.
पेट्रोल इंजिन असलेली जीप रॅंगलर लाँच झाली तेव्हा गाडीची किंमत 56 लाखांपासून सुरु होती. विशेष म्हणजे इंटरनेटवर ही गाडी लाँच होताच लोकांनी बुकिंगला सुरुवात केली होती. लवकरच या गाडीचा नवा मॉडेल येणार आहे.
2018 ऑटो एक्सपोमध्ये लाँच झालेली BMW ची जीटी केवळ पेट्रोल व्हेरिएंट आहे. या गाडीची किंमत 61.8 लाखांपासून सुरु होते. मात्र यानंतर डीझल व्हेरिएंटने लोकांना जास्त प्रभावित केले.
या आधी लाँच झालेली X3 जास्त लोकप्रिय झाली नाही. या गाडीमध्ये X5 पेक्षा 50 mm मोठा वीलबेस होता. तसेच एलईडी हेडलॅम्प, डिजीटल इंटूमेंट क्लस्टरची सुविधा देण्यात आली होती.
2018च्या एक्सपोमध्ये महिंद्राच्या या गाडीला लाँच केले होते. या गाडीच्या प्रसिद्धिचे कारण असं की, गाडीची किंमत 26.95 लाख ते 29.95 लाख आहे.