10 हजारांपेक्षा कमी किमतीतील 4G फोन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : सध्या बाजारात एकापेक्षा एक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी ग्राहकांना काहीतरी नवीन देत आहे. तसेच वेगवेगळे फीचर देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशामध्येच एखादा कमी बजेट आणि उत्कृष्ट फीचर असणारा स्मार्टफोन खरेदी करताना आपण नेहमी गोंधळून जातो. आज आम्ही तुम्हाला तुमच्या खिशाला परवडणारे आणि कमी पैशात उत्कृष्ट असे स्मार्टफोनबद्दल माहिती देणार […]

10 हजारांपेक्षा कमी किमतीतील 4G फोन
Follow us on

मुंबई : सध्या बाजारात एकापेक्षा एक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी ग्राहकांना काहीतरी नवीन देत आहे. तसेच वेगवेगळे फीचर देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशामध्येच एखादा कमी बजेट आणि उत्कृष्ट फीचर असणारा स्मार्टफोन खरेदी करताना आपण नेहमी गोंधळून जातो. आज आम्ही तुम्हाला तुमच्या खिशाला परवडणारे आणि कमी पैशात उत्कृष्ट असे स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहे. चला तर मग पाहूया…

 Honor 9N (9,499 रुपये)

हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोअरेजसोबत आहे. फोनमध्ये 3,000 mAh बॅटरी क्षमता दिली आहे. या फोनमध्ये  13+2 मेगापिक्सलचा ड्यूअल कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी यामध्ये तुम्हाला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

Lenovo K8 Note (9,990 रुपये)

5.5 इंच डिस्प्लेसह या फोनमध्येही 64 जीबी इंटरनल स्टोअरेज दिला आहे. फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 4,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Honor 7C (8,499 रुपये)

या फोनमध्ये 5.99 इंचाचा फुल डिस्प्ले दिला आहे. 4 जीबी रॅम+64 जीबी स्टोअरेज आहे. फोनमध्ये रिअर कॅमेरा 13+2 मेगापिक्सल असा ड्यूअल कॅमेरा सेटअप आहे. तर सेल्फी कॅमेरासाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेंसर दिला आहे.

Honor 8C (8,999 रुपये)

होनर 8सी स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम+ 32 जीबी स्टोअरेज व्हेरिअंट तसेच 6.26 इंचाची स्क्रीन दिली आहे. 4,000 mAh बॅटरी क्षमतेच्या फोनमध्ये 13+2 मेगापिक्सलचा ड्यूअल कॅमेरा दिला आहे. 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेऱ्याचा समावेश आहे.

Panasonic Eluga Z1 Pro (9,990 रुपये)

पॅनासोनीकचा या स्मार्टफोनमध्ये 6.18 इंचाचा डिस्प्ले आहे. 4 जीबी रॅम+ 64 जीबी स्टोअरेजच्या या फोनमध्ये 4,000 mAh ची बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 13+2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Coolpad Note 8 (8490 रुपये)

कुलपॅड नोट 8 मध्येही 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोअरेज दिला आहे. फोनमध्ये 5.99 इंचाचा एचडी स्क्रीन डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 16+0.3 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.