नवी दिल्ली | 19 डिसेंबर 2023 : केंद्र सरकारने या हिवाळी अधिवेशनात टेलिकम्युनिकेशन बिल 2023 सादर केले. या कायद्यामुळे देशात अनेक बदल दिसून येतील. नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ सारख्या एप्सबाबत पण मोठा फैसला घेण्यात आला आहे. या बिलामुळे एलॉन मस्क याच्या स्टारलिंकचा भारतातील प्रवेशाचा मार्ग प्रशस्त झाला आहे. तर जिओ, भारती एअरटेलसाठी मोठे आव्हान तयार होणार आहे. सोमवारी टेलिकॉम बिल 2023 संसदेत सादर करण्यात आले. टेलिकॉम सेवेत OTT चा सहभाग नाही.
व्हॉट्सअपसह स्काईपला दिलासा
केंद्र सरकारटे सॅटेलाईट स्पेक्ट्रमविषयीचे धोरण काय असेल याचे चित्र सुस्पष्ट झाल्याचे समोर आले. टेलिकॉम रेग्युलेटर्सला केंद्राने बळ दिले. गेल्या कायद्यात व्हॉट्सअप आणि व्हिडिओ कॉलिंगसह स्काईपवर एक मर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्याची व्याख्या तयार करण्यात आली होती. पण आता ही मर्यादा, व्याख्या हटविण्यात आली आहे. त्याचा या एप्सला मोठा फायदा होणार आहे. त्यांना बळ मिळणार आहे.
दंडातही केली कपात
टेलिकॉम कंपन्यांना लावण्यात येणाऱ्या दंडात बदल करण्यात आला आहे. हा दंड घटविण्यात आला आहे. कंपन्यांना जास्तीत जास्त 5 कोटींचा दंड लावण्यात येईल. यापूर्वी टेलिकॉम कंपन्यांवर 50 कोटी रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद होती. त्यात मोठा बदल झाला आहे. दंडातील ही कपात मोठा दिलासा देणारी आहे.
मोफत Whatsapp Calling
रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांनी यापूर्वी व्हॉट्सअप कॉलिंगविषयी वेगळी भूमिकै घेतली होती. OTT कम्युनिकेशन आणि सॅटेलाईट बेस्ट सर्व्हिस ऑडियो आणि व्हिडिओ कॉलची सुविधा देते आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारल्या जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी स्पेक्ट्रम फी आणि परवाना शुल्क पण आकारण्यात येत नव्हते. पण कायद्यातील अस्पष्टतेमुळे नेटफ्लिक्स, प्राईमने याविरोधात तक्रार दिली होती. याविषयी अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याचा अर्थ सध्या तरी व्हॉट्सअप कॉलिंगविषयी सरकारने कोणतेही शुल्क आकारण्याचे धोरण स्वीकारलेले नाही. त्यामुळे ग्राहकांना व्हॉट्सअप फ्री कॉलिंगचा आनंद घेता येईल.