नवी दिल्ली | 7 March 2024 : दोन मित्रांमध्ये खटके उडाले आहेत. जगातील दोन प्रज्ञावंतात सध्या वाद पेटला आहे. एकमेकांच्या गळ्यातील ताईत असणारे दोन मित्र आता एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. जगात कृत्रिम बुद्धिमत्तेवरुन वादळ उठले आहे. ChatGPT आणि AI हे शब्द तुमच्या कानावरुन गेलेच असतील. तर या नव तंत्रज्ञानाने जगभरात नवीन क्रांती होऊ घातली आहे. पण हे यशच ChatGPT च्या मुळावर उठले आहे. तर त्यामुळेच दोन मित्रात वितुष्ट आले आहे. सॅम ऑल्टमन आणि जगातील अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यात चांगलेच वाजले आहे. आहे तरी काय हा मामला?
वादाला फोडणी
तर ChatGPT ची मुळ कंपनी OpenAI आणि एलॉन मस्क यांच्यात गहिरे नातं आहे बुवा! ही कंपनीची सुरुवात होण्यापासून मस्क तिच्याशी जोडल्या गेला आहे. पण नंतर मस्क OpenAI पासून वेगळा झाला. आता मस्कने OpenAI आणि कंपनीचे सीईओ तथा मित्र सॅम ऑल्टमॅन याला थेट कोर्टात खेचले आहे. सॅमने सर्व करार तोडल्याचा आरोप मस्क याने लावला आहे. सॅम याने करार तोडत स्वतंत्र व्यवसाय थाटल्याचा आरोप मस्क याचा आहे. OpenAI मानवाच्या भल्याऐवजी मायक्रोसॉफ्टसाठी हमाली करत असल्याचा गंभीर आरोप मस्क याने लावला.
मैत्रीचे दिन छान गोजिरे
तर एलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमॅन यांच्यात अनेक वर्षांची मैत्री आहे. दोघांची मैत्री नजर न लागण्यासारखी होती. मस्क आणि त्याची कंपनी Tesla हे सॅमच्या पाठीशी ठामपणे उभे ठाकले होते. या दोघांनी त्यांच्या चर्चेचे चॅट सुद्धा काही वर्षांपूर्वी, साधारणतः पाच वर्षांपूर्वी ट्विटरवर शेअर पण केले होते. दोघांच्या मैत्रीचा अनेकांना हेवा वाटत होता. पण आता हा इतिहास झाला आहे.
सध्याची अपडेट काय