नवी दिल्ली : बँक, पासपोर्ट, आयटी रिटर्न भरण्यापर्यंत ते अनेक ठिकाणी आज आधार नंबरचा वापर केला जातो. पण येणाऱ्या काही दिवसात आता फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि युट्यूबसह इतर सोशल मीडियावरही लॉगईन करताना तुमच्या आधार कार्डचा नंबर विचारला जाण्याची शक्यता आहे. कारण, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजवर आळा बसण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे.
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेक न्यूज पसरवल्या जात आहेत. कुणीही, केव्हाही सोशल मीडियावर काही पोस्ट करत असतो. पोस्ट करणाऱ्या युजरला कसलीही माहिती नसते, पण तो चुकीची पोस्ट करत असतो. यासाठी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात फेसबुक आणि ट्विटरसह इतर सोशल मीडियावर आधार लिंक करण्यासाठी मागणी केली आहे.
अशा फेक न्यूज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने याचे दुष्परिणाम समाजावर होत आहेत. व्हायरल झालेल्या फेक न्यूजवर सरकारलाही आळा घालता येत नाही. त्यामुळे गेले काही दिवस यावर सरकारकडून फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
या कारणांमुळे आधार लिंकिंगची मागणी
दरम्यान, केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात आधार लिंक संबधीत मागणी केल्यानंतर डेटा सिक्युरिटी आणि वैयक्तिक माहिती लिक होण्याची भीती वर्तवली जात आहे.