यंदा उन्हाळा अधिकच कडक आहे. उन्हाच्या काहीलीने घरोघरी एसी लागले आहेत. या एसीच्या वाढत्या वापराने एसीमुळे घरात आगी लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे एसी वापरताना खूपच सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. मुंबईत अलिकडेच घरांना लागलेल्या आगींना एसी कॉम्प्रेसरचा स्फोट जबाबदार असल्याचे उघडकीस आले आहे. नुकतेच यूपीमधील नोएडा येथील एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये एसीने घराला आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी झाली नसली, तरी अनेक सोसायट्यांमध्ये असे अपघात वाढले आहेत. एसीचा कॉम्प्रेसर फुटल्याने देखील आगीच्या घटना वाढल्याचे आकडेवारी आहे. त्या एसीचा वापर करताना सावधानता बाळगण्याची गरज आहे.
वातानुकूलित यंत्रणेच्या वापराबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण थोड्याशा निष्काळजीपणामुळे देखील एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊ शकतो आणि मोठा अपघात होऊन प्राणावर देखील बेतू शकते. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूची योग्य ती देखभाल केली नाही, तर त्यात बिघाड होऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रीक वस्तू योग्य प्रकारे वापरणे गरजेचे आहे.
एअर कंडिशनर ( AC ) च्या कॉम्प्रेसरचा स्फोट होणे हा एक गंभीर बाब असून त्यामुळे वित्तहानी तसेच प्रसंगी जिवीतहानी देखील होऊ शकते. आगीच्या घटनांना बहुतांश वेळा एसीत झालेले शॉर्टसर्कीट किंवा कॉम्प्रेसरचा स्फोट कारणीभूत असतो. त्यामुळे गंभीर जखमा होऊन जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. अशा घटना काही चुका आणि निष्काळजीपणामुळे होतात, हे टाळण्यासाठी, योग्य ती काळजी आणि देखभाल करणे फार महत्वाचे आहे. कॉम्प्रेसरचा स्फोटला देखील काही कारणे असू शकतात…
उच्च तापमान हे कॉम्प्रेसरच्या स्फोटाचे प्रमुख कारण असू शकते. जर कॉम्प्रेसर उच्च तापमानात जर सतत चालू असेल तर आग किंवा स्फोट होण्याची शक्यता वाढते.
AC ची नियमितपणे सर्व्हीसिंग आणि देखभाल न केल्यास कॉम्प्रेसरमध्ये धूळ, घाण आणि इतर कचरा जमा होऊ शकतो, ज्यामुळे कॉम्प्रेसरवर दबाव वाढतो आणि तो फेल होऊ शकतो.
कॉम्प्रेसरमध्ये रेफ्रिजरंट गॅसच्या गळतीमुळे देखील स्फोट होऊ शकतो. गळती झाल्यास, गॅसचा दाब असामान्य होऊ शकतो, ज्यामुळे कॉम्प्रेसरला नुकसान पोहचू शकते.
व्होल्टेजचा सातत्याने चढ-उतार कॉम्प्रेसरच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते आणि कॉम्प्रेसरचे नुकसान करू शकतात, ज्यामुळे शेवटी स्फोट होऊ शकतो.
म्प्रेसरचा कूलिंग फॅन कार्य करत नसल्याने देखील कॉम्प्रेसर जास्त तापून स्फोट होऊ शकतो.
तुमच्या एसीची नियमित सर्व्हीसिंग करा. त्यामुळे कॉम्प्रेसरची साफसफाई, ऑयलिंग आणि सर्व देखभाल त्यामुळे वेळोवेळी होईल. दर 6 महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा तरी एसी रिपेअरिंगकरणाऱ्यांकडून त्याची सर्व्हीसिंग करून घ्या.
व्होल्टेज स्टॅबिलायझर वापर करावा, त्यामुळे व्होल्टेजच्या चढ उतारांमुळे कॉम्प्रेसरला नुकसान होणार नाही.
AC साठी योग्य दाबाने वीज पुरवठा होत आहे का याची खात्री करण्यासाठी नियमितपणे व्होल्टेज तपासा.
रेफ्रिजरंट गॅस गळती होत आहे का याची वेळोवेळी तपासणी करा. कोणत्याही प्रकारची गळती झाल्यास त्वरित टेक्निशियनला बोलावून तातडीने दुरुस्त करा. प्रमाणित तंत्रज्ञांकडूनच गॅस रिफिलिंग करा.
एअर फिल्टर आणि कूलिंग कॉइल्स नियमितपणे स्वच्छ करा. यामुळे कॉम्प्रेसरवर अतिरिक्त दबाव पडणार नाही आणि ते योग्यरित्या कार्य करेल.
कॉम्प्रेसर आणि कंडेन्सर युनिटला जास्त गरम होण्यापासून रोखण्यासाठी त्याच्याभोवती योग्य वायुव्हीजन होत असल्याची खात्री करा. कॉम्प्रेसर थेट सूर्यप्रकाशात किंवा खूप गरम ठिकाणी ठेवू नका.
कूलिंग फॅन व्यवस्थित काम करत असल्याची खात्री करण्यासाठी तो नियमितपणे तपासा. कूलिंग फॅनमध्ये काही अडचण आल्यास त्वरित दुरुस्त करा.