तुम्हीसुद्धा सर्विसींग न करतातच एसी वापरतायं? ही चुक पडू शकते महागात

| Updated on: Apr 16, 2023 | 11:30 PM

एअर कंडिशनरच्या सर्व्हिसिंग दरम्यान अनेक गोष्टी तपासल्या जातात, जसे की फिल्टर, कंडेन्सर कॉइल, कंप्रेसर, पंखा आणि मोटर. या गोष्टी तपासून समस्या ओळखल्या जाऊ शकतात आणि समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते.

तुम्हीसुद्धा सर्विसींग न करतातच एसी वापरतायं? ही चुक पडू शकते महागात
एअर कंडीशन
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : सध्या एअर कंडिशनर (Air conditioners tips) ही चैनीची सुविधा राहीलेली नसून गरज झालेली आहे.  एअर कंडिशनर्ससाठी सर्व्हिसिंग खूप महत्वाचे आहे. यामुळे तुमचे एअर कंडिशनर चांगले काम करते आणि त्यात कोणतीही अडचण येत नाही. एअर कंडिशनरच्या सर्व्हिसिंग दरम्यान अनेक गोष्टी तपासल्या जातात, जसे की फिल्टर, कंडेन्सर कॉइल, कंप्रेसर, पंखा आणि मोटर. या गोष्टी तपासून समस्या ओळखल्या जाऊ शकतात आणि समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते. साधारणपणे, दर सहा महिन्यांनी तुम्ही तुमच्या एअर कंडिशनरची सर्व्हिसिंग करून घ्यावी, जर तुम्ही तुमचे एअर कंडिशनर जास्त वापरत असाल किंवा जास्त धूळ किंवा धूर असलेल्या भागात एअर कंडिशनर वापरत असाल तर तुम्हाला अधिक सर्व्हिसिंगची गरज आहे.

तुमच्या एअर कंडिशनरची वेळोवेळी सर्विसींंग करून ऊर्जेचा वापर कमी करू शकता, निरोगी वातावरण राखू शकता आणि त्याचे आयुष्य वाढवू शकता. या उलट असे न केल्यास एअर कंडिशनर काहीवेळा जीवघेणे ठरते. होय  हे खरे आहे. जाणून घेऊया यामागचे कारणे.

एअर कंडिशनरची सर्विसीग न केल्यास काय होऊ शकते?

कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण वाढते: एअर कंडिशन सर्व्हिस केलेले नसल्यास, ते कार्बन मोनोऑक्साइड तयार करू शकते जे घातक ठरू शकते आणि गुदमरल्यासारखे होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

अनियमित काम: अनियमित सर्व्हिसिंगमुळे, तुमच्या एअर कंडिशनरला ऑपरेशनमध्ये अडचणी येऊ शकतात, नियमित सर्व्हिसिंग न केल्यामुळे, एअर कंडिशनरमध्ये घाण जमा होऊ शकते. ही घाण श्वासामार्गे आपल्या शरीरात जाऊ शकते.

जीव गुदमरू शकतो: सर्व्हिसिंगच्या अभावामुळे एअर कंडिशनरमध्ये जमा होणारी घाण आणि दूषित पदार्थ अस्थमासारख्या श्वसनाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी अधिक धोकादायक असू शकतात. प्रसंगी त्यांचा जीवही गुदमरू शकतो.

एअर कंडिशनरचे आयुष्य कमी होते: नियमित सर्व्हिसिंग न केल्यामुळे, एअर कंडिशनरमध्ये अधिक घाण साचते, ज्यामुळे त्याचे भाग खराब होतात, परिणामी त्याचे आयुष्य कमी होऊ लागते.