मुंबई : भारतात विविध ठिकाणी एअरटेलच्या ब्रॉडबँड (Airtel broadband) आणि मोबाईल सेवा सध्या बंद असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. भारतातील विविध ठिकाणचे अनेक युजर्स एअरटेलच्या नेटवर्क आउटेजची (Airtel Down) ट्विटरवर तक्रार करत आहेत. तर बहुतांश युजर्स एअरटेलच्या ग्राहक सेवा केंद्रावर तक्रार करत आहेत. ऑनलाइन अहवाल सूचित करतात की, ही समस्या व्यापक असू शकते आणि एअरटेल मोबाइल इंटरनेट आणि कंपनीच्या ब्रॉडबँड तसेच वाय-फाय सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. ऑनलाइन अहवाल सूचित करतात की एअरटेल (Airel) चे अॅप देखील या क्षणी काम करत नाही. दरम्यान, कंपनीने याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
ऑनलाइन अहवाल सूचित करतात की दिल्ली, मुंबई, नोएडा आणि इतर अनेक ठिकाणी फायबर इंटरनेट, ब्रॉडबँड, तसेच मोबाइल नेटवर्कचे सर्व एअरटेल कनेक्शन बंद आहेत. आउटेज ट्रॅकर डाउनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार एअरटेल इंटरनेटला शुक्रवारी, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून समस्या येत आहेत. Downdetector च्या मते, संपूर्ण भारतात 11:18 पर्यंत 3,729 युजर्सनी त्यांच्या कनेक्शनमध्ये आउटेज झाल्याची तक्रार नोंदवली होती. अनेक युजर्सनी सांगितले की, या महिन्यात त्यांना या समस्येचा सामना करावा लागण्याची ही दुसरी वेळ आहे.
User reports indicate Airtel is having problems since 11:34 AM IST. https://t.co/Txh31sb3Bn RT if you’re also having problems #Airteldown
— Down Detector India (@DownDetectorIN) February 11, 2022
एअरटेलची स्पर्धक कंपनी असलेल्या जिओला मुंबई विभागात गेल्या आठवड्यात अशाच पद्धतीच्या तक्रारींचा सामना करावा लागला होता. मात्र एअरटेल आउटेज खूप मोठ्या प्रमाणावर दिसत आहे, कारण डाउनडिटेक्टरवरील आउटेज नकाशा देशभरातील आउटेज दर्शवितो. जियोला केवळ मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात आउटेजचा सामना करावा लागला होता.
@airtelindia your broadband and mobile data are not working. #AirtelDown . Surprisingly #vodafoneidea is working .
— Karanveer S. Kohli (@KohliKaranveerS) February 11, 2022
#AirtelDown in India.#Airtel pic.twitter.com/HrT3goZ8Gl
— Rahul Pandit (@IMRahul_Pandit) February 11, 2022
Hey @Airtel_Presence My Fiber Internet is down today.#Airtel #AirtelDown
this is 2nd time in feb.— Ajay kumar (@measajay) February 11, 2022
Airtel is down for last 30 mins. Imagine the fate of those having Airtel black for the entire house!
Airtel black is no more than a marketing gimmick. Who will rely completely on these guys if the services are not reliable.#Airtel #AirtelDown @airtelindia @airtelnews— Shubham Laddha (@laddha97) February 11, 2022
दरम्यान, एअरटेलने ट्विटरवरुन नुकतीच याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. कंपनीने म्हटलं आहे की, आमच्या इंटरनेट सेवांमध्ये थोडासा व्यत्यय आला आणि यामुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता आमची सेवा सुरळीत झाली आहे. आमचे कर्मचारी आमच्या ग्राहकांना अखंड अनुभव देण्यासाठी काम करत आहेत.
Our internet services had a brief disruption and we deeply regret the inconvenience this may have caused you. Everything is back as normal now, as our teams keep working to deliver a seamless experience to our customers.
— airtel India (@airtelindia) February 11, 2022
इतर बातम्या
मोठी बॅटरी, 64MP कॅमेरासह Vivo चा किफायतशीर 5G स्मार्टफोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
अवघ्या 14990 रुपये किंमतीत Vivo चा 5G फोन लाँच, जाणून 5 महत्त्वाचे फीचर्स