Airtel Down : एअरटेलची हवा निघाली, सेवा कोलमडली, मोबाईलपासून ते ब्रॉडबँडपर्यंत सर्व्हिस ठप्प

| Updated on: Dec 26, 2024 | 2:38 PM

Airtel Service Down : एअरटेल सेवा कोलमडल्याने लाखो ग्राहकांना मोठा फटका बसला. मोबाईलपासून ते ब्रॉडबँडपर्यंत सर्वच ठिकाणी अडथळे येत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. गुरुवारी अचानक एअरटेलची सेवा ठप्प झाली. आऊटेजमुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे.

Airtel Down : एअरटेलची हवा निघाली, सेवा कोलमडली, मोबाईलपासून ते ब्रॉडबँडपर्यंत सर्व्हिस ठप्प
एअरटेल डाऊन
Follow us on

Airtel सेवा गुरुवारी अचानक ठप्प झाली. एअरटेल सेवा कोलमडल्याने लाखो ग्राहकांना मोठा फटका बसला. मोबाईलपासून ते ब्रॉडबँडपर्यंत सर्वच ठिकाणी अडथळे येत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. आऊटेज ट्रॅक करणारी साईट Downdetector ने ही आऊटेजची समस्या असल्याचे म्हटले आहे. अनेकांनी या वेबसाईटवर जाऊन एअरटेलची फसगत तपासली. दुपारपासून एअरटेल नेटवर्क कुठं हरवलं आहे, हे ग्राहक शोधत होता. आज सकाळी जवळपास 11 वाजता आऊटेजची सुरूवात झाली. कंपनीने ही समस्या लागलीच सोडवल्याचा दावा केला आहे. तरीही अनेक ग्राहकांच्या मोबाईलमधील इंटरनेट सेवा अजूनही कासवगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी कॉल ड्रॉपचा फटका बसला आहे.

Airtel चा मोठा ग्राहक वर्ग

हे सुद्धा वाचा

एअरटेलचा मोठा ग्राहक वर्ग आहे. ही कंपनी मोबाईल सिम सर्व्हिसपासून ते ब्रॉडबँडपर्यंतच्या सेवा पुरवते. अचानक सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांना फटका बसला. त्यांच्या दैनंदिन कामात व्यत्यय आला. ऑनलाईन बैठका, कार्यशाळेपासून ते इतर सेवांमध्ये अडथळा आला. अर्थात ही सेवा संपूर्ण देशात विस्कळीत झाली नाही तर देशातील काही भागात त्याचा परिणाम दिसून आला.

ग्राहकांना ना सिग्नल्स, ना इंटरनेट

अनेक ग्राहकांनी सांगितले की त्यांना No Signals ची समस्या भेडसावली. त्यानंतर त्यांना ना मोबाईल सेवा मिळाली ना इंटरनेटची सुविधा मिळाली. त्यांचे मॅसेज सुद्धा समोरच्या व्यक्तीला मिळाले नाहीत. तर काहींना इंटरनेटचा वापर करता आला नाही. सेवा विस्कळीत होण्याचा परिणाम देशातील अनेक मोठ्या शहरात दिसून आला. Downdetector या साईटने त्याचे छायाचित्र दाखवले आहे.

एअरटेलचा १,१९९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या १,१९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला काय मिळतं याबद्दल बोलायचं झालं तर हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक फायदे मिळत आहेत. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण २१० जीबीचा डेटा मिळतो. तर डेली डेटा २.५ जीबी देण्यात आलेला आहे. कंपनी त्यांच्या ग्राहकांच्या मनोरंजनाची ही काळजी घेत असून या प्लॅनमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म ॲमेझॉन प्राईम आणि विंकचे सब्सक्रिप्शन देखील फ्री मिळत आहे.