मुंबई : अमेझॉनवर (Amazon) सध्या समर सेल सुरू आहे. यामध्ये Samsung Galaxy S20 FE, Samsung Galaxy M12, Tecno Spark 8C आणि इतर स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट दिले जात आहेत. स्मार्टफोनच्या (Smartphone) खरेदीवर तुम्हाला मेगा सुट मिळण्याची संधी उपलब्ध होत आहे. याशिवाय काही ठिकाणी तुम्हाला कॅशबॅकचीही (Cashback) ऑफर देण्यात आलेली आहे. या सेलमधून तुम्ही स्मार्टफोनसह विविध वस्तूंची खरेदी करु शकणार आहात. या डील्समध्ये तुमच्या पैशांचीदेखील बचत होणार आहे. या लेखातून सॅमसंग आणि टेक्नो फोनवर उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम डीलबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
या 5G सपोर्टेड स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे.
यात 6.5 इंचाची सुपर AMOLED स्क्रीन आहे. त्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. हे सेल दरम्यान 34,990 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते.
Samsung Galaxy M12 मध्ये 6000mAh बॅटरी आहे. यात Exynos850 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे तर फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. सेल दरम्यान तुम्ही हा फोन केवळ 9,999 रुपयांना खरेदी करू शकता.
Samsung Galaxy M33 5G मध्ये ऑक्टा कोर Exynos 1280 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल आहे. त्याच्या फ्रंटला 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. हा फोन सेलमध्ये 17,999 रुपयांना खरेदी करता येईल.
दरम्यान, या समर सेलमध्ये सॅमसंगच्या स्मार्टफोन्सशिवाय अनेक Tecno स्मार्टफोन्सवरही सूट दिली जात आहे.
Tecno Spark 8C मध्ये 90Hz रिफ्रेश रेट डिसप्ले देण्यात आला आहे. यात 6.6 इंचाची HD+ स्क्रीन आहे. यात 5000mAh बॅटरी आहे. हा स्मार्टफोन Amazon समर सेलमध्ये फक्त 7,999 रुपयांना विकला जात आहे.
Tecno Spark 8T मध्ये 50 मेगापिक्सलचा हाय रिझोल्यूशन कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच्या फ्रंटला 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. या फोनमध्ये Helio G35 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन सेल दरम्यान 8,999 रुपयांना खरेदी करता येईल.