स्मार्टफोन चाहत्यांसाठी हा सेल फार महत्वाचा असणार आहे. त्यात तुम्हाला जर वनप्लसचा लेटेस्ट स्मार्टफोन OnePlus 13 आणि 13R खरेदी करायचा असेल तर यापेक्षा चांगली संधी दुसरी नाही. नुकत्याच लाँच झालेल्या या दोन्ही स्मार्टफोनची विक्री १० जानेवारीपासून सुरू झाली आहे. तुम्हला आज या स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंटचा ही फायदा मिळणार आहे. जर तुम्ही स्वत:साठी फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या दोन फोनपैकी कोणताही फोन घेऊ शकता. ॲमेझॉनने वर्षाच्या पहिल्या सत्राची सुरुवात केली आहे. ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये तुम्हाला जवळपास सर्वच प्रॉडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. एक्सचेंज ऑफर्स आणि बँक ऑफर्सचाही ओघ सुरू आहे.
या सेलमध्ये तुम्हाला आयफोन, वनप्लस आणि पोकोचे लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊयात उपलब्ध ऑफर्सबद्दल…
वनप्लस १३ ॲमेझॉन सेल
तुम्ही जर वनप्लस 13 घेण्याचा विचार करत असाल तर हा निर्णय कुठेतरी योग्य ठरू शकतो. या फोनमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक फीचर्स मिळत आहेत. ॲमेझॉन या शॉपिंग साईटवर तुम्ही हे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या फोनची किंमत 72,999 रुपये आहे. पण या ॲमेझॉन सेलमध्ये तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ 69,998 रुपयांमध्ये डिस्काउंटसह मिळू शकतो. जर तुम्ही एकाच वेळी इतके पैसे भरू शकत नसाल तर प्लॅटफॉर्म तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देत आहे.
हा फोन तुम्ही 3,394 रुपयांच्या मासिक ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. याशिवाय निवडक क्रेडिट कार्डवरील ऑफर्सचाही लाभ घेऊ शकता. या फोनमध्ये ६.८२ चा शेवटचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे.
आयफोन 16 वर डील्स
तुम्ही जर आयफोन प्रेमी असाल तर तुम्हाला ॲमेझॉनच्या या सेलमध्ये आयफोन 16 वर ही मोठी ऑफर मिळत आहे. हा फोन तुम्ही डिस्काउंटसह फक्त 74,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. जर तुम्ही ते ईएमआयवर घेऊ इच्छित असाल तर मासिक ईएमआय फक्त 3,631 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकता. येथे तुम्हाला लेटेस्ट आयफोनचे सर्व कलर ऑप्शन मिळत आहेत. एसबीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
ग्रेड रिपब्लिक डेल सेलमध्ये सूट
तसेच या सेलमध्ये तुम्हाला मोबाईल ॲक्सेसरीजवर ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. लॅपटॉपवर ४० टक्के, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७५ टक्के आणि फॅशन आणि ब्युटी प्रॉडक्ट्सवर ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. त्याचप्रमाणे सेलमध्ये तुम्ही अधिक प्रीमियम स्मार्टफोन्सवर बेस्ट डील्सचा फायदा घेऊ शकता. आजपासून या सेलला सुरुवात झाली आहे.