Amazon चा धमाका ! 50 इंची Ultra-HD TV फक्त 30 हजार रुपयांमध्ये, जाणून घ्या फिचर्स

| Updated on: Jan 02, 2021 | 2:50 PM

ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनने नववर्षानिमित्त टेटेस्ट फिचर्सचा समावेश असेलेल्या टिव्ही बाजारात आणल्या आहेत. (amazon smart tv India)

Amazon चा धमाका ! 50 इंची Ultra-HD TV फक्त 30 हजार रुपयांमध्ये, जाणून घ्या फिचर्स
Follow us on

मुंबई : ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनने नववर्षानिमित्त लेटेस्ट फिचर्सचा समावेश असेलेल्या टिव्ही बाजारात आणल्या आहेत. या कंपनीने AmazonBasics Fire TV Edition Ultra-HD TV या सिरीजचे दोन मॅडेल लॉन्च केले आहेत. यामध्ये 50 इंच आणि 55 इंच असणारे दोन प्रकारचे टीव्ही आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे 29,999 आणि 34,999 रुपये आहे. अमेझॉनने लॉन्च केलेल्या या नव्या टिव्हींची स्पर्धा Xiaomi, Hisense अशा नामांकित कंपन्यांच्या टिव्हींशी असेल. (amazon launches smart tv on bwest price below the 30000 rs)

अ‌ॅमेझॉनने 50 इंच असणाऱ्या टिव्हीचे मॉडेल AB50U20PS आणि 55 इंची टिव्ही AB55U20PS या नावाने बाजारात आणले आहे. या दोन्ही टीव्ही 4K HDR LED डिस्प्ले असलेल्या आहेत. या दोन्ही प्रकारच्या टिव्हींमध्ये Dolby Vision, Dolby Atmos यांच्यासाऱखे अनेक प्रकारचे फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

AmazonBasics Fire TV Edition Ultra-HD TV चे स्पेसिफिकेशन्स काय?

अ‌ॅमेझॉनने भारतात पहिल्यांदाच टीव्ही लॉन्च केली आहे. अ‌ॅमेझॉनने बाजारात आणलेल्या टीव्हीचे स्क्रीन रिझॉल्यूशन 3840×2160 पिक्सेल आहे. तसेच, या दोन्ही टीव्ही एचडीआर आणि डॉल्बी व्हीजनला सपोर्ट करतात. या टीव्हींमध्ये 20W असून या टिव्हींमध्ये quad-core Amlogic प्रोसेसर आहे. दोन्ही टिव्हींचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 60 हर्ट्झ पर्यंत आहे.

अ‌ॅमेझॉनने भारतात आणलेल्या या टिव्हींमध्ये दोन HDMI पोर्ट आहेत. तसेच दोन USB पोर्ट्सची सुविधाही या टिव्हींमध्ये देण्यात आलेली आहे. या दोन्ही टिव्हींना Alexa व्हॉईस असिस्टन्स सपोर्ट आहे. विषेष म्हणजे ऑनलाईन जग आणि वेबसीरीजचा वाढता विस्तारहीसुद्धा अ‌ॅमेझॉनने लक्षात घेतला आहे. या दोन्ही टिवींमध्ये नेटफ्लिक्स, डिज्नी प्लस हॉटस्टार यूट्यूब सोबतच अनेक अ‌ॅप डाऊनलोड करुन मनोरंजनाचा आस्वाद घेतला जाऊ शकतो.

दरम्यान, अ‌ॅमोझॉनने बाजारात आणलेल्या AmazonBasics Fire TV Edition Ultra-HD TV ची Xiaomi, Hisense, Vu आणि TCL सारख्या नामवंत कंपन्यांशी स्पर्धा असेल.


संबंधित बातम्या :

Xiaomi च्या ‘या’ फोनचा मार्केटमध्ये धुमाकूळ, अवघ्या 5 मिनिटात 3.5 लाख स्मार्टफोन्सची विक्री

WhatsApp वरील डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी ही भन्नाट ट्रिक वापरा

फ्लिपकार्टमध्ये मोठी गडबड, विक्री न होताच सर्व वस्तू आऊट ऑफ स्टॉक

(amazon launches smart tv on bwest price below the 30000 rs)