Amazon Sale 2022 : अमेझॉन (Amazon) या ई-कॉमर्स साईटवर सेल सुरू झाला आहे आणि या सेलदरम्यान, अनेक महत्त्वाच्या उत्पादनांवर सूट मिळत आहे. या सेल दरम्यान, युजर्स पंखे (Fans), कुलर (Cooler) आणि AC वर चांगल्या डिस्काऊंट्सचा लाभ घेऊ शकतात. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म रिजनल न्यू इयर स्टोअर (Amazon Regional new Year Store) अंतर्गत एक सेल सुरू आहे, जो 15 एप्रिलपर्यंत चालेल. या सेलमध्ये एसी आणि कूलर व्यतिरिक्त इन्व्हर्टर एसी, फ्रीज, एअर कुलर, वॉशिंग मशीन, फर्निचर आणि क्लिनिंग प्रॉडक्ट्स खरेदी करता येतील. कूलर आमि एसीवर जवळपास 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. चला तर मग Amazon वर उपलब्ध असलेल्या या डील आणि ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.
अॅमेझॉन या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर पंखे आणि कूलर्ससाठी एक वेगळा विभाग तयार करण्यात आला आहे, ज्यावर क्लिक केल्यानंतर जवळपास सर्व मोठ्या ब्रँडचे तसेच लोकल ब्रँड्सचे कुलर आणि पंखे एकाच ठिकाणी पाहता येतील. तसेच, या पंख्यांच्या रेंजमध्ये टेबल फॅन, स्टँडिंग फॅन आणि सीलिंग फॅन सारख्या पर्यायांचा समावेश आहे.
रिमोट आणि लायटिंगवाले पंखे देखील इथे पाहायला मिळतील. जे वेगवेगळ्या किंमतींच्या सेगमेंटमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. युजर्स हे पंखे रिमोटवरील ऑन आणि ऑफ बटणाच्या सहाय्याने कंट्रोल करु शकतात. तसेच या पंख्यांमध्ये लायटिंग असेल तर या लाईट्सदेखील रिमोटद्वारे हाताळता येतील.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर कूलरदेखील विकले जातात. कंपनीने बजाज पीएक्स 97 टॉर्कला बेस्ट सेलरच्या श्रेणीमध्ये समाविष्ट केले आहे. यामध्ये हनी कॉम्ब पॅड वापरले आहेत, या कूलरची किंमत 6199 रुपये आहे. याशिवाय क्रॉम्पटोन आणि सिम्फनीसारख्या कंपनीचे डिझाइन कूलरदेखील आहेत.
अमेझॉन सेलमध्ये ब्लू स्टार, व्होल्टास आणि एलजीसह अनेक ब्रँड्सच्या एसींवर सूट देण्यात आली आहे. या एसींमध्ये वायफाय इन्व्हर्टर सपोर्ट देण्यात आला आहे. LG 1.5 Ton 5 Star WiFi Inverter Windows AC ची किंमत 36950 रुपये ठेवण्यात आली आहे.
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स