मुंबई : जर तुम्ही Android स्मार्टफोन वापरत असाल तर सावध व्हा… कारण नुकतंच Android स्मार्टफोनमध्ये एक नवं Malware आढळले आहे. त्यामुळे युजर्सच्या फोनचे नुकसान होते. हा Malware एकूण आठ अँड्राईड अॅप्समध्ये आढळला आहे. आतापर्यंत हा मालवेअर दक्षिण पूर्व आशिया आणि अरब राष्ट्रातील युजर्सच्या फोनमध्ये आढळला आहे. दरम्यान McAfee Cell Analysis ने दिलेल्या माहितीनुसार, हा Malware आढळणारे अॅप 7,00,000 पेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले आहे. (Android Smartphone User delete these 8 apps)
हे मालवेअर फोटो एडिटर, वॉलपेपर, रिडल्स, किबोर्ट स्क्रिन आणि अनेक कॅमेरा संबंधित अॅप्समध्ये आढळला आहे. तसेच या अॅप्सच्या माध्यमातून तो युजर्सच्या फोनमध्ये शिरकाव करत आहे. या अॅपमधील मालवेअर SMS नोटिफिकेशनद्वारे फोन हायजॅक करतात. त्यानंतर अनधिकृत खरेदी करतात. मिळालेल्या माहितीनुसार, हे अॅप सुरुवातीला नॉर्मल मॉडेल म्हणूनच लाँच करण्यात आले होते. यानंतर अपडेटवेळी त्यात हा मालवेअर त्यात टाकण्यात आला असावा, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे Google Play Retailer मध्ये ते पूर्णपणे सिद्ध झाले होते.
McAfee सेल सेफ्टीने Android / Etinu बाबतचे अलर्ट दिले आहे. हे अॅप्स मालवेअर करंट डायनॅमिक कोड लोडिंगद्वार हल्ला करतो. तसेच हा मालवेअर एनक्रिप्टेड पेलोड्स अॅपच्या मिळत्या जुळत्या फोनच्या फोल्डरमध्ये अॅड होतो. त्यात “cache.bin,” “settings.bin,” “knowledge.droid,” किंवा “.png” अशा नावांचा उल्लेख असतो.
त्यामुळे या व्हायरसला ओळखणे फार अवघड असते. यानंतर हा मालवेअर स्वत:चा एक URL उघडेल आणि अनधिकृत खरेदी करतो. इतकेच नाही तर हे मालवेयर तुमच्या सूचनांवरही नजर ठेवते. तसेच फोनचा SMS ही चोरु शकतो. त्यामुळे जर तुमच्या फोनमध्ये कोणत्याही अडचणी असतील तर तुम्ही हे अॅप तातडीने Uninstall करावे.
तातडीने करा हे 8 अॅप Uninstall
com.studio.keypaper2021
com.pip.editor.digicam
org.my.favorites.up.keypaper
com.tremendous.coloration.hairdryer
com.ce1ab3.app.photograph.editor
com.hit.digicam.pip
com.daynight.keyboard.wallpaper
Com.tremendous.star.ringtones
McAfee सेल रिसर्च टीम सध्या या सर्व अॅप्सवर नजर ठेवत आहे. लवकरच हा व्हायरस नष्ट केला जाईल, असे सांगितले जात आहे. (Android Smartphone User delete these 8 apps)
संबंधित बातम्या :
90,000 रुपयांचा लॅपटॉप अवघ्या 29 हजारात, 13 हजारांचा लॅपटॉप 10 हजारात, वॉरंटीसह
Fact Check : सरकारकडून ऑनलाईन शिक्षणासाठी फ्री रिचार्जची ऑफर, मेसेजमधील दावा खरा की खोटा?