Apple event 2023 LIVE : आयफोन 15 सीरिज सी टाईप पोर्टसह लाँच, iWatch मध्ये काय असेल खासियत ते जाणून घ्या

| Updated on: Sep 13, 2023 | 12:16 AM

Apple event 2023 LIVE iphone 15 series launch Updates : आयफोन 15 सीरिज बाबतची उत्सुकता थोड्याच वेळात संपणार आहे. कंपनी आयफोन 15 सीरिज स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. आज रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी या सीरिजची लाँचिंग होईल.

Apple event 2023 LIVE : आयफोन 15 सीरिज सी टाईप पोर्टसह लाँच, iWatch मध्ये काय असेल खासियत ते जाणून घ्या
Follow us on

मुंबई : आयफोन 15 सीरिज ठरल्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात लाँच होत आहे. गेल्या काही दिवसांपासून लीक्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती. प्रत्यक्षात या हँडसेटमध्ये काय फीचर्स यावरून पडदा दूर होणार आहे. आयफोन 15 सीरिजसह यात आयवॉचही लाँच करणार आहे. तसेच कंपनी अपकमिंग ऑपरेटिंग सिस्टमही अपडेट करण्याची घोषणा करेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Sep 2023 11:39 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : आयफोन 15 प्रो मॉडेलमध्ये ॲक्शन बटण असेल

    आयफोन 15 प्रोमध्ये ॲक्शन बटण असणार आहे. आयफोन 15 प्रो मध्ये ए 17 बायोनिकसह ॲक्शन बटण दिलं आहे. यामुळे व्हॉईस मेमो, ट्रान्सलेशन, कॅमेरा, फ्लॅशलाईट, सायलेंट मोड, शॉर्टकट, कॅमेरा फोकस सहजरित्या कंट्रोल करता येईल.

  • 12 Sep 2023 11:37 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : आयफोन 15 ची किंमत किती असेल?

    कंपनीने या स्मार्टफोन्सची किंमत जाहीर केली आहे. आयफोन 15 ची किंमत 799 डॉलर्सपासून सुरू होईल. तर आयफोन 15 प्लसची किंमत 899 डॉलर्सपासून सुरू होईल. भारतीय बाजारात या फोनची किंमत किती असेल याबाबत घोषणा अद्याप केलेली नाही.


  • 12 Sep 2023 11:25 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : आयफोन 15 मध्ये टाइप सी पोर्ट

    आयफोन 15 मध्ये टाइप सी पोर्ट असणार आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या माध्यमातून इअरबॉड्स, आयफोन आणि दुसरे प्रोडक्ट चार्ज करता येणार आहेत.

  • 12 Sep 2023 11:19 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : आयफोन 15 मध्ये अल्ट्रावाईड बँड आणि सी टाईप चार्जिंग पोर्ट

    आयफोन 15 हा 15 6.1-इंचाचा आणि iPhone Plus 6.7-इंचाचा आहे.याची ग्लास टणक असून पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. आयफोन 15 OLED सुपर रेटिना डिस्प्लेसह असेल आणि  ब्राइटनेस 2000 nits पर्यंत जाऊ शकते. कंपनीने यात A16 बायोनिक चिपसेट दिली आहे. गेल्या वर्षीच्या प्रो प्रकारात ही सिस्टम होती. आयफोनमध्ये सी टाईप पोर्ट दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत चर्चा होती.

  • 12 Sep 2023 11:15 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : आयफोन 15 सीरिज लाँच, काय असेल खासियत ते जाणून घ्या

    ॲपलने नवीन iPhone सीरीज लाँच केली आहे. कंपनीने iPhone 15 आणि iPhone 15 Plus लाँच केला आहे या स्मार्टफोनमध्ये 48MP मुख्य कॅमेरासह येईल. तसेच अनेक कॅमेरा फीचर्स आहेत.

  • 12 Sep 2023 11:10 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : iWatch ची किंमत किती असेल?

    ॲपल वॉच एसईच्या नव्या मॉडेलची किंमत 20,627 रुपये असेल. तर तुम्ही आयवॉच 9 हा 399 डॉलरमध्ये (33,063 रुपये) आणि आयवॉच अल्ट्रा 2 हा 799 डॉलरमध्ये (66,209 रुपये) खरेदी करू शकता. आजपासून प्री-ऑर्डर करू शकता. कंपनीने गेल्या वर्षी आयवॉच Ultra लाँच केले होते. आता याचं अपडेट आलं आहे. नव्या आयवॉचमध्ये मोठी स्क्रीन आणि वॉच 9 चे सर्व फीचर्स मिळतील.

  • 12 Sep 2023 11:02 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : ॲपलचा मोठा निर्णय, झिरो कार्बन प्रोडक्टची घोषणा

    ॲपलने प्रोडक्टमधून लवकरच कार्बन काढलं जाईल अशी घोषणा केली आहे. 2030 पर्यंत सर्व प्रोडक्ट सोलार आधारित आणि निसर्ग संवर्धन करणारे असतील. कार्बन उत्सर्जन या माध्यमातून रोखलं जाईल.

  • 12 Sep 2023 10:42 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : ॲपल वॉचमध्ये काय आहे खासियत? जाणून घ्या

    Apple Watch Series 9 सर्वात सोपं आणि वेगवान बनवलं गेलं आहे. याची बॅटरी लाईफही चांगील आहे. आयवॉच वापरणं आणखी सोपं होणार आहे. एस 9 सिस्टमसह नव्या आयफोन वॉचचं लाँचिंग सुरु झालं आहे. आता तुम्ही आयवॉचच्या माध्यमातून Siri कडून तुमचा आरोग्य डेटा मागू शकाल. हे फीचर सुरुवातील इंग्रजी आणि मँडरीनमध्ये उपलब्ध असेल. त्याचबरोबर आयवॉचच्या माध्यमातून आयफोन सहज शोधू शकाल. याची खासियत म्हणजे नुसत्या दोन  चुटक्या वाजवल्या की फोन उचलला जाणार आहे. आयवॉच पाच रंगात उपलब्ध असेल.

  • 12 Sep 2023 10:39 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : टिम कुक यांनी ॲपल पार्कमधून लाँचिंग कार्यक्रमाला केली सुरुवात

    टीम कुकने यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. हा कार्यक्रम नवीन आयफोन आणि वॉचवर आधारित असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ॲपल व्हिजन प्रोसह मॅकबुकची माहिती त्यांनी सुरुवातीला दिली.

  • 12 Sep 2023 10:33 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : iPhone 15 सीरिजची लाँचिंग सुरु

    गेल्या काही दिवसांपासून आयफोन 15 बाबत असलेली प्रतीक्षा संपली आहे. कंपनीकडून आयफोन 15 सीरिजचं लाँचिंग सुरु. लाईव्ह स्ट्रिमिंग सुरु झाली आहे. आता एक एक करून अपडेट समोर येतील.

  • 12 Sep 2023 09:55 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : आयफोन 15 चं लाँचिंग थोड्याच वेळात, येथे पाहता येणार कार्यक्रम

    आयफोन 15 लाँचिंग प्रोग्राम ॲपलच्या युट्यूब चॅनेल आणि ॲपल वेबसाईटवर पाहता येईल. तसेच ॲपल टीव्ही आणि ॲपल डेव्हलपर्स ॲपवरही पाहू शकता.

  • 12 Sep 2023 07:37 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : आयफोन 15 असेल ‘मेड इन इंडिया’

    आयफोन 15 चे लॉन्चिंग भारतीयांसाठी खास आहे. कारण आयफोन 15 लाँचच्या दिवशी विकला जाणारा आयफोन ‘मेड इन इंडिया’ असण्याची ही पहिलीच वेळ असेल. Apple iPhone 15 दक्षिण आशियाई देशांच्या बाजारपेठेत उपलब्ध होईल. हे फोन ‘मेड इन इंडिया’ असतील.

  • 12 Sep 2023 06:55 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : आयफोन 15 मध्ये असेल टाइप सी चार्जिंग केबल

    आयफोन 15 मध्ये टाइप सी चार्जिंग केबल आणि पोर्ट असेल. त्यामुळे आता चार्जिंगचं टेन्शन दूर होणार आहे. त्यामुळे फास्ट डेटा ट्रान्सफर होईल, असं सांगण्यात येत आहे.

  • 12 Sep 2023 06:52 PM (IST)

    Apple event 2023 LIVE : आयफोन 15 मध्ये ॲक्शन बटण असणार

    आयफोन 15 मध्ये ॲक्शन बटण असण्याची शक्यता आहे. आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स मध्ये ॲक्शन बटण मिळू शकते. यामुळे व्हॉईस मेमो, ट्रान्सलेशन, कॅमेरा, फ्लॅशलाईट, सायलेंट मोड, शॉर्टकट, कॅमेरा फोकस सहजरित्या कंट्रोल करता येईल.