मुंबई : अॅप्पल इंडियाने (Apple India) शुक्रवारपासून आयफोन 12 प्रो (iPhone 12 Pro), आयफोन 12 (iPhone 12) भारतीय बाजारात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध केला आहे. यावेळी कंपनीने ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स दिल्या आहेत. 5,637 रुपयांच्या दरमहा ईएमआयवर तुम्ही हा महागडा फोन घरी घेऊन जाऊ शकता. तसेच हा स्मार्टफोन ग्राहक ट्रेड-इनसह 47,900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. नवा आयफोन 12 खरेदी करणारे ग्राहक अॅप्पल ट्रेडसह 22000 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकतात. (Apple iphone 12 and iphone 12 pro pre booking started with best EMI offers in India)
आयफोन 12 प्रो दरमहा 10,110 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येईल. ग्राहक हा स्मार्टफोन ग्राहक ट्रेड-इनसह 85,900 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. ट्रेड-इन निवडणारे ग्राहक 34,000 रुपयांची बचत करु शकतील. हे दोन्ही स्मार्टफोन प्री-ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध आहेत. 30 ऑक्टोबरपासून त्याची डिलीव्हरी सुरु होईल.
अॅप्पलने 13 ऑक्टोबर रोजी चार नवीन आयफोन लाँच केले आहेत. त्यामध्ये आयफोन 12, आयफोन 12 मिनी, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्सचा समावेश आहे. या चार फोनपैकी आता भारतात आयफोन 12 आणि आयफोन 12 प्रो विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
आयफोन 12 आणि 12 प्रो ची किंमत
आयफोन 12 ची किंमत 79,900 रुपये इतकी आहे. यामध्ये तुम्हाला 64 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेला स्मार्टफोन मिळेल. तर 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज असलेला आयफोनन 12 खरेदी करण्यासाठी तुम्हाला 84,900 आणि 94,900 रुपये मोजावे लागतील.
आयफोन 12 प्रो ची किंमत 1,19,900 रुपये आहे. या किमतीत तुम्हाला 128 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेला स्मार्टफोन मिळेल. तर 256 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या आयफोन 12 प्रो साठी तुम्हाला 1,29,900 रुपये मोजावे लागतील. आयफोन 12 प्रो मध्ये 512 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेला स्मार्टफोनदेखील लाँच करण्यात आला आहे. याची किंमत तब्बल 1,49,900 रुपये इतकी आहे.
आयफोन 12 चे फिचर्स
Apple ने आयफोन 12 पाच नवीन रंगांमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये निळा, लाल, काळा, पांढरा आणि हिरवा या रंगांचा समावेश आहे. आयफोन 12 मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ आणि सर्वोत्कृष्ट स्क्रीन आहे.
आयफोन 12 सिरेमिक शील्डने सुसज्ज आहे ज्यामुळे हा फोन पूर्वीपेक्षा टिकाऊ बनला आहे. आयफोन 12 हा स्मार्टफोन 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा + 12 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेन्ससह लाँच करण्यात आला आहे.
आयफोन 12 मध्ये डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर आयफोन 12 प्रो मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. आयफोन 12 मध्ये 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. जो वाइड आणि अल्ट्रा वाइड लेन्सने सुसज्ज आहे.
आयफोन 12 प्रो मध्ये 12 मेगापिक्सलचा F1.6 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरादेखील देण्यात आला आहे. सोबत 7 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
iPhone 12 घेताय? थोडं थांबा, कारण डुअल सिम मोडवर 5G चालणार नाही!
सणासुदीच्या मुहूर्तावर Gionee चा बजेट स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त 5499 रुपये, जाणून घ्या फिचर्स
iPhone च्या चाहत्यांसाठी खूशखबर! ‘या’ तीन स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात
Samsung Galaxy M31 Prime भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S20 FE चं प्री-बुकिंग सुरु, आठ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स
(Apple iphone 12 and iphone 12 pro pre booking started with best EMI offers in India)