Apple iPhone : महागड्या आयफोनला करा टाटा, असा स्वस्तात स्मार्टफोन मिळवा

| Updated on: Sep 29, 2023 | 7:05 PM

Apple iPhone : नवीन iPhone च्या किंमती पाहिल्यावर अनेकांचा मोहभंग होतो. पण जर आयफोनच खरेदी करायचा असेल तर काही प्लॅटफॉर्म तुम्हाला आयफोन स्वस्तात मिळवून देऊ शकतात. या ठिकाणी तुम्ही Apple चे जुने आयफोन अगदी स्वस्तात मिळवू शकता. तर नवीन आणि जुन्या मॉडेल्समधील किंमतीचा फरक ही तपासू शकता.

Apple iPhone : महागड्या आयफोनला करा टाटा, असा स्वस्तात स्मार्टफोन मिळवा
Follow us on

नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2023 : अनेक जणांना सध्या Apple च्या आयफोनचा फिव्हर चढला आहे. पण iPhone अनेक चाहत्यांच्या बजेटबाहेर आहे. त्यामुळे हे चाहते नाराज झाले आहे. पण त्यांनी मन खट्टू करण्याची गरज नाही. ग्राहकांनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, जसे की Amazon अथवा Flipkart कडे मोर्चा वळवला पाहिजे. तर काही असे पण प्लॅटफॉर्म आहेत की जिथे सेंकड हँड मोबाईल आणि इतर गॅझेटस अत्यंत स्वस्तात मिळवता येतात. कमी किंमतीत तुम्हाला या स्मार्टफोनची वॉरंटी मिळते. जुन्या मोबाईलवर पण काही प्लॅटफॉर्म वॉरंटी देतात. मग अजून काय हवं, नाही का?

ही साईट करा चेक

iPhone 15 Series तुमच्या आवाक्याबाहेर, बजेटबाहेर असेल तर तुम्ही सेंकड हँड iPhone 14 अथवा iPhone 13 या मॉडेलकडे मोर्चा वळवू शकता. जुना मोबाईल खरेदी आणि विक्री करण्यासाठी तुम्ही Cashify या साईटची मदत घेऊ शकता. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने केवळ स्मार्टफोनच नाही तर टिव्ही, टॅबलेट सारख्या वस्तू पण खरेदी-विक्री करु शकता.

हे सुद्धा वाचा

हा पण चांगला पर्याय

जुना स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी केवळ कॅशिफाईच बाजारात उपलब्ध आहे असे नाही. तर Amazon Refurbished Store आणि इतर पण अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने महागडा स्मार्टफोन तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येतो. इतर साईटच्या तुलनेत या प्लॅटफॉर्मवर फोनच्या किंमती कमी असतात. ग्राहकांना स्वस्तात हा स्मार्टफोन खरेदी करता येतो.

अशा आहेत किंमती

  • आयफोन 15 आल्यापासून आयफोन 14, 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 64 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे. तर कॅशिफाईवर हाच सेंकड हँड आयफोन 14, 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 49,999 रुपये मिळत आहे. म्हणजे महागडा सेंकड हँड आयफोन तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहे. जवळपास 15 हजार रुपयांची बचत होत आहे. कालावधीनुसार या किंमतीत तफावत दिसू शकते.
  • फ्लिपकार्टवर आयफोन 13, 128 जीबी व्हेरिएंट 52 हजार 499 रुपयांना विक्री होत आहे. तर कॅशिफाईवर हेच मॉडेल 41 हजार 499 रुपयांना मिळत आहे. सरळ सरळ 11 हजार रुपयांची बचत होत आहे. ऑफर वा इतर घडामोडींमुळे किंमतीत तफावत असू शकते.

  • सर्वात महत्वाचे म्हणजे जुन्या मोबाईलवर कोणती साईट तुम्हाला वॉरंटी देते, ते तपासा. ही गोष्ट महत्वाची आहे. कॅशिफाई ग्राहकांना जुन्या मोबाईलवर पण 6 महिन्यांची वॉरंटी देते. म्हणजे स्वस्तात मोबाईल तर मिळतोच पण वॉरंटीचा बोनस पण मिळतो.