तुम्ही जर आयफोनचे चाहते असाल तर तुम्हाला सर्वात कमी किमतीत असलेला हा आयफोन लवकरच खरेदी करता येणार आहे. ॲपलचा चौथ्या जनरेशनचा iPhone SE या वर्षी अधिकृतपणे लाँच केला जाऊ शकतो. दरम्यान भारतीय बाजारपेठेत iPhone SE 4 बद्दल अनेक अफवा समोर येत आहेत. आता या फोनच्या फीचर्सबद्दलही काही डिटेल्स समोर आले आहेत. सर्वात कमी किंमतीत लाँच होणारा हा ॲपलचा पहिला स्मार्टफोन ठरू शकतो. आयफोन एसई 4 मध्ये काय वैशिष्ट्ये असतील? कॅमेरा कसा असेल आणि नवीन कोणते फीचर्स दिसेल याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
ॲपलच्या आगामी आयफोनमध्ये फोटो-व्हिडिओग्राफीसाठी तुम्हाला ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. या फोनला iPhone 16e असेही म्हटले जाण्याची शक्यता आहे. हे iPhone 16 चे स्वस्त व्हर्जन देखील असू शकते.
टिप्सटरच्या मते, iPhone SE 4/ iPhone 16e लवकरच बाजारात येऊ शकतो. याचा डिस्प्ले साइज ६.०६ इंच असू शकतो. हा फुल एचडी+ LTPS OLED डिस्प्ले असेल. ज्याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्झ असू शकतो. स्मार्टफोनमध्ये फेस आयडी सपोर्ट असू शकतो. iPhone 16 प्रमाणेच Apple चा A18 बायोनिक चिपसेटने सुसज्ज असू शकतो. कदाचित या फोनमध्ये सिंगल रियर कॅमेरा मिळेल.
पुढील पिढीचा iPhone SE या महिन्याच्या अखेरीस iPad 11 आणि iOS 18.3 आणि iPadOS 18.3 सॉफ्टवेअर अपडेटसह लाँच होण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गचे मार्क गुरमन यांनी मात्र ही अफवा खोटी असल्याचे सिद्ध केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा फोन एप्रिलच्या अखेरीस लाँच केला जाऊ शकतो. या फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर याची किंमत 500 डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार सुमारे 42,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.
लक्षात ठेवा की, ॲपलकडून या आगामी फोनच्या लाँचिंगबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अनेक मीडिया रिपोर्ट्स आणि टिप्सटरनुसार हा फोन या वर्षी बाजारात लाँच केला जाऊ शकतो.