ॲपल इयरबड्समध्ये येणार दमदार फीचर्स, ह्रदयांचे ठोके आणि तापही तपासणार, जाणून घ्या

| Updated on: Jan 01, 2025 | 7:17 PM

ॲपल त्यांच्या आयफोन आणि ॲपल वॉचमध्ये डेडिकेटेड हेल्थ फीचर्स देत आहे. आता कंपनी नेक्स्ट जेन एअरपॉड्स प्रोमध्ये नवीन हेल्थ फीचर्स जोडणार आहे, त्यानंतर युजर्स एअरपॉड्सच्या मदतीने शरीराचे तापमान आणि हृदयाचे ठोके मॉनिटर करू शकतील, ज्याचा फायदा अनेकांना होईल. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी

ॲपल इयरबड्समध्ये येणार दमदार फीचर्स, ह्रदयांचे ठोके आणि तापही तपासणार, जाणून घ्या
Follow us on

ॲपल कंपनीने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या दमदार असलेले आयफोन आणि वॉच तसेच अनेक प्रॉडक्ट यांची चर्चा सुरूच असते. अश्यातच ॲपल चाहत्यांसाठी आणखीन एक डिवाइस लाँच करण्याच्या तयारीत आहेत. ॲपल कंपनी त्यांच्या नेक्स्ट जेन एअरपॉड्स प्रोमध्ये नवीन हेल्थ फीचर्स जोडणार असून त्यांच्या आगामी एअरपॉड्स प्रोसाठी मोठी तयारी करत आहे. ब्लूमबर्गच्या मार्क गुरमन रिपोर्टनुसार, अमेरिकन कंपनी मोठी योजना आखत आहे. नेक्स्ट जेन एअरपॉड्स प्रोमध्ये काही नवीन फीचर्सची चाचणी केली जात आहे, ज्याच्या मदतीने हार्ट रेट आणि शरीराचे तापमान मॉनिटर केले जाऊ शकते.

ॲपलने नेक्स्ट जनरेशन एअरपॉड्स प्रोवर काम सुरू केले आहे, ज्यात ॲपल वॉचसारख्या अनेक हेल्थ फीचर्सचा समावेश असणार आहे. यावर्षी कंपनीने यात Hearing Aid फीचर लाँच केले आहे, जे आयओएस १८.१ वर काम करते. ॲपल वॉचमध्ये हेल्थ फोकस्ड फीचर्स दिल्यानंतर कंपनी एअरपॉड्स प्रोच्या पुढच्या व्हर्जनमध्ये हेल्थ ट्रॅकिंगच्या ॲडव्हान्स फीचर्सचा समावेश करणार आहे. ज्यामध्ये युजर्सला ताप वगैरे तपासता येणार आहे.

ॲपल वॉचने अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

ॲपल वॉचने त्याच्या हेल्थ ट्रॅकिंग फीचर्सच्या मदतीने अनेकांचे प्राण वाचवले आहेत. असे अनेक फीचर्स आहेत जे आपोआप काम करतात, त्यामुळे जर युजर बेशुद्ध झाला किंवा अपघात झाला तर घड्याळ ऑटोमॅटिक ॲम्ब्युलन्स वगैरेला घरी कॉल करू शकते.

हे सुद्धा वाचा

एअरपॉड्समध्ये कॅमेरा उपलब्ध असेल?

ॲपल एअरपॉड्स प्रोबद्दल यापूर्वी माहिती समोर आली होती की कंपनी यात कॅमेरा बसवण्याची योजना आखत आहे, जरी ब्लूमबर्गच्या मार्क गुरमन यांच्या रिपोर्टनुसार कॅमेरा सह एअरपॉड्स लाँच होण्यास अद्याप बराच कालावधी असल्याचं सांगितले असले तरी याबाबत कोणतीही टाइमलाइन वगैरेही समोर आलेली नाही.

ॲपल एअरपॉड्समध्ये आहे हे खास फीचर

ॲपलने यावर्षी झालेल्या इव्हेंटदरम्यान त्यांच्या AirPods Pro 2 देखील सादर केला. लाँचिंगदरम्यान कंपनीने AirProds pro मध्ये Hearing Aid फीचरचा समावेश केल्याचे सांगितले होते. अशाने ज्या लोकांना खूप मोठयाने आवाज दिला तर ऐकायला जातो त्या लोकांनी त्याचा वापर करून अधिक चांगले आणि स्पष्ट ऐकू शकतात. या प्रॉडक्टला FDAप्रमाणपत्र मिळाले आहे.

AirPods Pro 2 Amplify ची वारंवारता वाढवली असल्याने ज्यांना कमी ऐकायला जाते त्यांच्यासाठी हे उत्पादन एक चांगला पर्याय ठरू शकते. यासाठी डिव्हाइसमध्ये आयओएस १८.१ असणे आवश्यक आहे.