नवी दिल्ली : अखेर देशाची राजधानी दिल्लीत भारतातील दुसरे ॲपल स्टोअर सुरू झाले आहे. Apple चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टिम कुक (Tim Cook) यांनी साकेत, दिल्ली येथे Apple Store चे आज (20 April) उद्घाटन केले. भारतातील पहिले Apple Store मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे, ज्याचे 18 एप्रिल रोजी उद्घाटन झाले. आयफोन उत्पादक कंपनीला भारतात 25वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कंपनीने भारतात दोन ॲपल स्टोअर्स उघडली आहेत.
साकेत येथील ॲपल स्टोअर पाहण्यासाठी आज खूप गर्दी झाली होती. असेच काहीसे चित्र मुंबईतील पहिल्या ॲपल स्टोअरच्या उद्घाटनावेळी पाहायला मिळाले. एकाच वेळी दोन स्टोअर्स उघडल्याने ॲपल भारतीय ग्राहकांशी अधिक चांगल्या प्रकारे संपर्क साधू शकेल. त्याचबरोबर ग्राहकांना ॲपलची विविध उत्पादने एकाच छताखाली खरेदी करण्याची संधीही मिळणार आहे.
Apple Store Delhi चे वैशिष्ट्य
दिल्लीतील ॲपल स्टोअर खास डिझाइन केलेल्या वक्र स्टोअरफ्रंटद्वारे ग्राहकांचे स्वागत करते. ॲपलची उत्पादने आणि ॲक्सेसरीज डिस्प्ले दाखवण्यासाठी व्हाईट ओक टेबल्सचा वापर करण्यात आला आहे. तर, स्टोअर फीचर वॉल भारतात बनवण्यात आली आहे. Appleच्या सर्व सुविधांप्रमाणे, Apple Saket 100 टक्के अक्षय उर्जेवर (renewable energy) चालते आणि ते कार्बन न्यूट्रल आहे.
#WATCH | Apple CEO Tim Cook inaugurates India’s second Apple Store at Delhi’s Select City Walk Mall in Saket. pic.twitter.com/KnqGiaf7oX
— ANI (@ANI) April 20, 2023
Apple Store Delhi चे डिझाइन
आज दिल्लीत साकेत येथील ॲपल स्टोअरच्या उद्घाटनापूर्वी टीम कुक यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली. त्यांनी भारतात गुंतवणूक सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. Apple Store बद्दल बोलायचे तर त्याची रचना खूपच आकर्षक आहे. ॲपल स्टोअरला भारतीय रूप देण्यासाठी आयफोन निर्मात्यांनी खूप मेहनत घेतली आहे. कंपनीने दिल्लीच्या अनेक प्रसिद्ध गेट्स, जागांपासून प्रेरणा घेऊन या स्टोअरची रचना केली आहे.
Thank you Prime Minister @narendramodi for the warm welcome. We share your vision of the positive impact technology can make on India’s future — from education and developers to manufacturing and the environment, we’re committed to growing and investing across the country. pic.twitter.com/xRSjc7u5Ip
— Tim Cook (@tim_cook) April 19, 2023
Apple Store Delhi मधील सुविधा
ॲपल साकेतमध्ये होणारे ‘टुडे ॲट ॲपल’ सेशन
Skills : आयफोनसह सुरुवात करणे
Tips : iPhone वर फोटो एडिट करणे
Art Lab For Kids : आपली स्वत:ची इमोजी तयार करणे
Skills : Apple Watch पर्सनलाइज करणे
Tips : iPad वर आयडिया कॅप्चर करणे.