iPhone 15 Series : आला रे आला! ॲप्पलचा iPhone 15 या दिवशी बाजारात

| Updated on: Aug 05, 2023 | 4:19 PM

iPhone 15 Series : ॲप्पलच्या iPhone 15 विषयी चाहत्यांसाठी सुखद बातमी समोर आली आहे. या दिवशी हा बहुप्रतिक्षेत स्मार्टफोन बाजारात येईल. त्याची प्री-ऑर्डर पण बुक करता येईल. पुढील महिन्यात या दिवशी iPhone 15 बाजारात दाखल होत आहे.

iPhone 15 Series : आला रे आला! ॲप्पलचा iPhone 15 या दिवशी बाजारात
Follow us on

नवी दिल्ली | 05 ऑगस्ट 2023 : ॲप्पलच्या (Apple) अपकमिंग iPhone 15 सीरीजविषयी अनेक दिवसांपासून उत्सुकता ताणल्या गेली आहे. चाहत्यांना या स्मार्टफोनची सर्वाधिक उत्सुकता आहे. ही सीरीज काही बदलांसह चाहत्यांना सुखद धक्का द्यायला येत आहे. यामध्ये मुख्यता युएसबी टाईप सी चार्जिंगची सोय देण्यात आली आहे. याशिवाय युझर्सला अनेक जोरदार अपडेटची मेजवाणी या सीरीजमध्ये मिळेल. iPhone 15 सीरीज कधी बाजारात येईल, याचा पण खुलासा झाला आहे. तसेच त्याची प्री-ऑर्डर पण बुक करता येईल. पुढील महिन्यात या तारखेला iPhone 15 बाजारात (iPhone 15 Series Launch Date) दाखल होत आहे.

आयफोनसाठी तयारी

अधिकृतपणे आयफोन कोणत्या दिवशी बाजारात येत आहे, याची माहिती समोर आली नाही. त्यासाठी चाहत्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागेल. काही कर्मचाऱ्यांनी 9to5Mac यांना या लाँच डेटविषयी अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांना 13 सप्टेंबरपासून कोणतीही सुट्टी न घेण्यास सांगितले आहे. यादिवशी एक फोन बाजारात आणण्यात येत असल्याचे कारण सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

या दिवशी आयफोन बाजारात

ॲप्पलचे सर्वच लाँचिंग इव्हेंट आतापर्यंत मंगळवारी झाले आहेत. गेल्यावेळचा कार्यक्रम मात्र बुधवारी झाला होता. 13 सप्टेंबर रोजी बुधवार आहे. त्यामुळे यादिवशी कंपनी आयफोनची सुधारीत श्रेणी बाजारात उतरवू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

प्री-ऑर्डर करा बुक

9to5Mac च्या अहवालानुसार, जर आयफोन 13 सप्टेंबर रोजी बाजारात आला तर कंपनी प्री-आर्डर 15 सप्टेंबरपासून सुरु करु शकते. मोबाईल फोनची विक्री 22 सप्टेंबरपासून होण्याची शक्यता आहे. ॲप्पलचा iPhone 15 सीरीजच्या सध्याच्या आयफोनपेक्षा नवीन फोन 200 डॉलरने महाग असेल.

असा होईल बदल

लीक्सनुसार, iPhone 15 मध्ये कोपरे गोलाकार असतील. डिस्प्लेच्या चारही बाजूने बेजेल्स असतील. नवीन 4 मॉडेल लायटनिंग नसतील. तर डायनॅमिक आयलँड आणि युएसबी-सी सुविधेसह असतील. कंपनी प्रो मॉडलमध्ये स्टेनलेस स्टील फ्रेमऐवजी टायटेनियमची नवीन फ्रेम देऊ शकते.

काय असतील फिचर

iPhone 15 आणि 15 Plus मध्ये कंपनी A16 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देईल. तर iPhone 15 Pro आणि 15 Pro Max नवीन A17 चिपसह असेल. प्रो मॉडेलमध्ये कंपनी अधिक चांगले ऑप्टिकल झूमची सुविधा देईल. त्यासोबत एक पेरिस्कोप लेंस देण्यात येईल.

काय असेल किंमत
ॲप्पलचा iPhone 15 सीरीजच्या सध्याच्या आयफोनपेक्षा नवीन फोन 200 डॉलरने महाग असेल. तर स्टँडर्ड मॉडेल आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस याच्या किंमतीत मिळण्याची शक्यता आहे.