मुंबई : व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप म्हणून ओळखलं जातं. व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवे फीचर घेऊन येतं. व्हॉट्सअॅपसह फेसबुक मॅसेंजर, टेलिग्राम, सॅन्पचॅट हे सोशल मीडिया मॅसेजिंग अॅपही लोकांमध्ये फार प्रसिद्ध आहे. या मॅसेंजिग अॅपचे काही फिचर युजर्समध्ये फार लोकप्रिय आहे. मात्र अद्याप हे काही फिचर व्हॉट्अॅपमध्ये देण्यात आलेले नाही. त्यामुळे व्हॉट्सअॅप युजर्समध्ये निराशा पाहायला मिळत आहे.
Android invisible mode : या फिचरमुळे युजर्स व्हॉट्सअॅपवर ऑनलाईन असतानाही तुम्ही स्वत:ला लपवू शकता. सध्या व्हॉट्सअॅपमध्ये युजर्सला आपले लास्ट सीनचा पर्याय बंद करता येतो. त्याशिवाय व्हॉट्सअॅपमधील read receipts या ऑप्शनवर क्लिक केल्यावर चॅटिंग करताना समोरच्या युजर्सला तुम्ही मॅसेज वाचला की नाही हेही समजत नाही. मात्र तरीही समोरच्या व्यक्तीला तुम्ही ऑनलाईन आहात की नाही हे समजते. मात्र इन्स्टाग्राम आणि मॅसेंजरमध्ये युजर्स ऑनलाईन असतानाही तुम्हाला स्वत:ला लपवता येते.
Automated “away” responses : अवघ्या काही दिवसांपूर्वी ईमेलमध्ये एक Automated “away” responses नावाचे एक फिचर उपलब्ध झाले आहे. या फिचरमुळे तुम्ही सुट्टीवर असताना अचानक एखादा महत्त्वाचा मेल आला, तर त्या मेलला ऑटोमेटिक रिप्लाय दिला जातो. अशाचप्रकारे व्हॉट्सअॅपवरही हे फिचर उपलब्ध करावे, अशी मागणी युजर्स करत आहेत.
Blocking screenshots : हे फिचर Snapchat या सोशल मीडियावर मॅसेजिंग अॅपवर उपलब्ध आहे. यामुळे युजर्सला कोणत्याही व्हिडीओ, फोटो, किंवा चॅटचे स्क्रीनशॉट घेता येत नाही. मात्र व्हॉटसअॅपवर ही सुविधा अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे जर तुमचा मोबाईल चुकून कुठे विसरलात तर तुमचे व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल होऊ शकतात. जर व्हॉसअॅपवर हे फिचर देण्यात आले, तर तुमचे चॅट सुरक्षित राहू शकतात.
Self-destructing messages : हे फिचर Telegram मध्ये देण्यात आले आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स एका विशिष्ट कालावधीनंतर ठरावीक मॅसेज डिलीट होतील अशी सुविधा देण्यात आली आहे. भारतात व्हॉट्सअॅप हे सोशल मीडिया मॅसेजिंगचे महत्त्वाचे अॅप आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपद्वारे हजारो मॅसेज येत असतात. त्यामुळे जर हे फिचर व्हॉट्सअॅपमध्ये देण्यात आले तर युजर्सचा फार मोठा फायदा होईल. याद्वारे तुम्ही व्हॉट्सअपमध्ये एक ठरावीक कालावधी ठरवू शकता आणि या कालावधीनंतर तुमचा तो मॅसेज आपोआप डीलीट होईल.
Birthday Notification : अनेकदा तुमच्या जवळच्या मित्राचा वाढदिवस तुम्ही विसरता. त्यामुळे तुम्हाला त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देता येत नाही. यामुळे काही वर्षांपूर्वी फेसबुकने Birthday Notification नावाचे फिचर उपलब्ध करुन दिले. याद्वारे तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या लोकांचे बर्थ-डे नोटिफिकेशन तुम्हाला येतात. त्याद्वारे तुम्ही त्या व्यक्तीला सहज शुभेच्छा देता येतात. मात्र व्हॉट्सअॅपमध्ये हे फिचर्स देण्यात आलेले नाही.
संबंधित बातम्या :
लेट नाईट चॅटिंग करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपकडून ‘गुड न्यूज’