भारतात होळी आणि राज्यात रंगपंचमीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पण या रंगोत्सवाला नुकसानीचे गालबोट लागायला नको. पाणी आणि रंगांच्या विना धुळवडीची कोणी कल्पना तरी करु शकतं का? पण या दोन्ही वस्तू तुमच्या इलेक्ट्रॉनिक गझेट्ससाठी सर्वात हानीकारक ठरतात. ईअरफोन वा स्मार्टवॉच घालून तुम्ही रंगपंचमी साजरी करायला जात असाल तर नुकसान होणारच. तुमचा मोबाईल पाण्यात भिजला तर रंगोत्सवाच्या आनंदावर विरजण पडेल. तेव्हा या टिप्स तुमच्या उपयोगी ठरतील.
मोबाईल भिजला, आता काय करु?
जर तुमचा मोबाईल भीजला अथवा रंगाचे पाणी गेल्यास, सर्वात अगोदर तो फोन स्विच ऑफ करा. त्यानंतर फोनला एका स्वच्छ कपड्याने पुसा. या फोनमध्ये सिम कार्ड ट्रे बाहेर काढा. जर बॅक पॅनल उघडता येत असेल तर ते बाहेर काढा. पण आता अनेक फोन हे नॉन-रिमुव्हएबल बॅक पॅनलचेच येत आहेत. फोन स्वच्छ करताना कोणत्याही अणकुचीदार वस्तूचा वापर करु नका.
फोन सुखवा
फोन पाण्यात भिजला असेल तर हळूच त्यावर चापटी मारुन पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. फोनला स्वच्छ केल्यानंतर तो उघड्यावर कोरडा होण्यासाठी तसाच राहू द्या. फोन कोरडा करण्यासाठी हेअर ड्रायर अथवा तांदळाचा बिलकूल वापर करु का. तांदळाच्या डब्यात फोन ठेवल्यास काही दाणे त्याच्या आत फसून फोन खराब होण्याची भीती असते.
मोबाईलला पाण्यापासून कसे वाचवणार