नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून एलन मस्क (Elon Musk) आणि ट्विटर (Twitter) यांच्यात वाद सुरु आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीनं ट्विटरसोबत करार केला खरा पण तो टिकेल की नाही, यात आता जगभरातील लोकांना स्वारस्य निर्माण झालंय. कारण, मागच्या काही दिवसांपासून एलन मस्क, ट्विटर आणि त्यांच्या करारासंदर्भात अनेक बातम्या आल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच बातम्या ट्विटर आणि एलन मस्क यांच्यात चाललेल्या वाटाघाटीविषयीच्या आहेत. इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतचा मोठा करार केलाय. मात्र, हा करार झाला असला तरी मस्क आणि ट्विटरमधल्या कुरबुरी काही कमी झालेल्या नाहीत. मस्क यांनी म्हटलंय की, जर त्यांना बनावट खात्यांबद्दल (Fake accounts) माहिती दिली नाही तर ते या करारापासून दूर होतील. यामुळे पुन्हा एकदा जगभराच्या नजरा ट्विटरकडे लागल्या आहेत.
मस्क हे टेस्ला तसेच SpaceXचे CEO आहेत. त्यांच्या वकिलांनी सोमवारी ट्विटरवर पाठवलेल्या पत्रात हा इशारा दिला आहे. त्यात म्हटलं की मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेण्याची ऑफर दिल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर कंपनीला नियमीत माहिती देण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन 229 दशलक्ष खात्यांपैकी किती ट्विटर अकाऊंट खोटे आहेत, याचं मूल्यांकन करू शकेल. खोटी खाती समोर येऊ शकते.
एलन यांच्या वकिलांनी पत्रात म्हटलंय की, ट्विटरने फसव्या खात्यांच्या तपास मापदंड किंवा पद्धतींबद्दल तपशील द्यायला हवा. मात्र, ट्विटरचा तर्क मस्क यांना कोणताही डेटा न देण्याकडे दिसतोय. मस्क यांना आकडे यासाठी पाहिजे. कारण, त्यांना स्वत:खोट्या खात्यांची माहिती मिळेल. यामुळे त्यांना या आधी देखील खोट्या खात्यांबद्दल भाष्य केलं होतं. मस्क यांचं म्हणनं आहे. की कंपनी आपल्या कामात खूप दिरंगाई करत आहे. वकीलांच्या माहितीनुसार मस्क यांचा विश्वास आहे की कंपनी एप्रिलच्या करारानुसार अधिकारांचे उल्लंघन ट्विटरकडून होत आहे.
इलॉन मस्क ट्विटरसोबतचा करार एकतर्फी रद्द करू शकत नाहीत किंवा ठेवू शकत नाहीत, यावर देखील वेगवेगळं बोललं जातंय. मस्क यांनी हा करार तोडल्यास त्यांना एक अब्ज डॉलर्सची ब्रेक-अप फी भरावी लागू शकते, असंही काही तज्ञांचं मत आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रीमार्केटमध्ये ट्विटरचे शेअर्स पाच टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.