दिल्लीत मुख्यमंत्री आणि आपचे मुख्य अरविंद केजरीवाल हे गेल्या एक आठवड्यापासून सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) कोठडीत आहेत. त्यांच्यावर ईडीने प्रश्नांची सरबत्ती केली आहे. पण या चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना उत्तर जाणून घेण्यासाठी आव्हानांचाय सामना करावा लागत आहे. त्यात सर्वात मोठे आव्हान आहे ते अरविंद केजरीवाल यांच्या अनलॉक आयफोनचे. आयफोनच पासवर्ड समोर येत नसल्याने ईडीने हा फोन उघडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु केले आहे. ईडीचे पथक ॲप्पल कार्यालयात ठाण मांडून बसल्याची चर्चा आहे.
ईडीपुढे मोठे आव्हान
या वृत्तानुसार, ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या आयफोन संदर्भात ॲप्पलशी संपर्क केला. त्यांनी आयफोन उघडण्यासाठी कंपनीकडे सहकार्य मागितले. तेव्हा कंपनीने डेटा मिळविण्यासाठी पासवर्ड आवश्यक असल्याचे सांगितले. ईडीकडे केजरीवाल यांचे चार स्मार्टफोन आहेत. हे मोबाईल त्यांनी कारवाईदरम्यान जप्त केले आहेत.
केजरीवाल न्यायालयीन कोठडीत
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे. ईडीने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. राऊज एव्हेन्यू कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. कथित मद्य घोटाळ्यात केजरीवाल यांच्या अगोदर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, माजी मंत्री सत्येंद्र जैन आणि राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीत मद्य धोरण ठरविताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्थात आपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.