Asus ROG Phone 7 Series पॉवरफुल प्रोसेसरसह लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

| Updated on: Apr 13, 2023 | 8:39 PM

Asus ROG Phone 7 Series अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे. या लेटेस्ट सीरिज अंतर्गत दोन नवे स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊयात फीचर्स एका क्लिकवर

Asus ROG Phone 7 Series पॉवरफुल प्रोसेसरसह लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Asus ROG Phone 7 Series अखेर लाँच, जाणून सर्वकाही एका क्लिकवर
Follow us on

मुंबई : आसुस कंपनीने Asus ROG Phone 7 Series अंतर्गत कंपनीने Asus ROG Phone 7 Ultimate आणि Asus ROG Phone 7 ग्राहकांसाठी लाँच केले आहेत. या गेमिंग स्मार्टफोन्समध्ये कुलिंग सिस्टमपण आहे. त्यामुळे मोबाईलवर गेम खेळणाऱ्यांना चांगला अनुभव मिळणार आहे. कंपनीने आसुस ROG फोन 6 सीरिजचा अपग्रेड वर्जन आहे. दोन्ही स्मार्टफोनची विक्री पुढच्या मे महिन्यात सुरु होणार आहे. चला तर मग Asus ROG Phone 7 Ultimate आणि Asus ROG Phone 7 या दोन स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.

Asus ROG Phone 7 आणि Asus ROG Phone 7 Ultimate चे फीचर्स

कॅमेरा सेटअप : दोन्ही मॉडेल्समध्ये तीन रियर कॅमेरा सेटअप आहे. 50 मेगापिक्सल सोनी IMX766 प्रायमरी कॅमेरा सेंसरसह 13 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर आणि 8 मेगापिक्सल मायक्रो सेंसर आहे. फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाटी 32 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर आहे.

बॅटरी : 65 व्हॉट वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000 एमएएचची बॅटरी आसुसच्या या स्मार्टफोनमध्ये दिली आहे.

चिपसेट, रॅम आणि स्टोरेज : स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी आसुस ब्रँडच्या या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी अँड्रेनो 740 जीपीयु दिला आहे. फोनमध्ये 16 जीबीपर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS4.0 इंटरनल स्टोरेज आहे.

डिस्प्ले : फोनमध्ये 6.78 इंचाची फुल एचडी+ (2448 x 1080) एमोलेड डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 165 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 720 हर्ट्ज टच सँपलिंग रेट आहे. या व्यतिरिक्त फोन 1000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 395 पिक्सल प्रति इंच पिक्सल डेनसिटीसह येतो.

कनेक्टिव्हीटी : या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी एनएफसी, जीपीएस, ब्लूटूथ वर्जन 5.3 आणि वायफायसह इतर फीचर्स दिले आहेत. लेटेस्ट स्मार्टफोन्समध्ये आयपी54 रेटिंगसह येतो.

Asus ROG Phone 7 किंमत

आसुस ROG फोन 7 च्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत 74 हजार 999 रुपये आहे. हा फोन तुम्हाला स्ट्रॉम व्हाईट रंगात मिळेल.

Asus ROG Phone 7 Ultimate किंमत

आसुस ROG Phone 7 Ultimate च्या 16 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत 99 हजार 999 रुपये आहे.