मुंबई : डिजिटल पेमेंट सुरक्षित बनवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ऑनलाईन पेमेंटमध्ये महत्त्वाचा (digital payment rules change) बदल केला आहे. यापुढे आता ऑनलाईन पेमेंट करताना एटीएम पिनची गरज लागणार नाही. एटीएम पिन ऐवजी आता ओटीपी पासवर्डची सुविधा दिली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने ऑनलाईन पेमेंट आणि अॅग्रिगेटर्स कंपन्यांना याबाबतच्या सूचना (digital payment rules change) दिल्या आहेत.
यापुढे आता दोन हजार रुपयांच्या ऑनलाईन पेमेंटसाठी एटीएम पिनची गरज लागणार नाही. त्या ऐवजी तुम्हाला ओटीपी पासवर्डची गरज लागेल. एटीएम पिनद्वारे फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आरबीआयकडून हा निर्णय घेण्यात आला. लवकरच ओटीपी पासवर्डची सुविधा सुरु केली जात आहे. ओटीपी थेट युझर्सच्या मोबाईलवर येणार त्यामुळे इतर कोणी तुमच्यासोबत फसवणूक करण्याची शक्यता कमी आहे.
ई-कॉमर्स कंपन्यांना आरबीआयच्या सूचना
आरबीआयने ई-कॉमर्स कंपन्यांनाही ऑनलाईन पेमेंट संबंधित सूचना दिल्या आहेत. ऑर्डर कॅन्सल किंवा इतर काही गोष्टीत रिफंड मिळणार असेल तर ते पैसे ग्राहकाने पेमेंट केलेल्या बँक खात्यात किंवा क्रेडिट कार्डमध्ये जमा झाले पाहिजे. बऱ्याचदा अनेक कंपन्या रिफंड बँक खात्यात न देता थेट ई-वॉलेटमध्ये ट्रान्सफर करतात.
पेमेंट अॅग्रिगेटर्सला नोडेल अधिकारी नियुक्ती करावे लागणार
आरबीआयच्या सूचनेनुसार पेमेंट अॅग्रिगेटर्स कंपनी ग्राहकांचे एटीएम पिन मागू शकत नाहीत. याशिवाय पेमेंट अॅग्रिगेटर्सला ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागेल, असे आदेश आरबीआयने दिले आहेत. याशिवाय मोबाईल अॅपवरही तक्रार करण्याची सुविधा असावी.