फ्लिपकार्टचा ‘एंड ऑफ सीझन’ (End Of Season) सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना बँक डिस्काउंट, कॅशबॅक आणि इतर ऑफर्सचा लाभ मिळणार आहेत. या ऑफर्सचा (discounts) फायदा घेऊन ग्राहक बजेट स्मार्टफोन खरेदी करू शकता. मोबाईलवर ग्राहकांना एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील मिळत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना बजेट रेंज, मिड रेंज आणि फ्लॅगशिप डिव्हाइसेसवर सूट मिळत आहे. 11 जूनपासून सुरू झालेला फ्लिपकार्ट सेल 17 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. सेलमध्ये ॲक्सिस बॅंक (Axis Bank) कार्ड वापरल्यास 10 टक्के त्वरित सूट आणि पेटीएम (Paytm) द्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के कॅशबॅक आहे. या लेखातून सेलमध्ये उपलब्ध असलेल्या आकर्षक ऑफर्सची माहिती जाणून घेऊया.
फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहकांना 7,749 रुपयांच्या सवलतीनंतर Infinix Hot 12 Play खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन 6000mAh बॅटरीसह येतो. जर तुम्ही स्वस्त 5G फोन शोधत असाल, तर तुम्ही Realme 9 5G, खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन 10,999 रुपयांच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध होईल. AMOLED डिसप्ले आणि 64MP कॅमेरा असलेले Redmi Note 10s 10,999 मध्ये खरेदी करू शकता. यासह Infinix Note 12 Turbo स्मार्टफोनचे 8GB रॅम व्हेरिएंट 13,249 मध्ये खरेदी करू शकता. मल्टीकलर स्मार्टफोन Vivo V23 5G 28,490 मध्ये खरेदी करू शकता. हा फोन 50MP सेल्फी कॅमेरासह उपलब्ध आहे. Xiaomi 11i 5G सवलतीनंतर 19,999 मध्ये खरेदी करू शकता. Xiaomi 11i Hypercharge 21,999 मध्ये खरेदीस उपलब्ध आहे.
या सेलद्वारे ग्राहक सवलतीत Apple iPhone देखील खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये 40,499 रुपयांमध्ये iPhone 12 Mini खरेदी करू शकता. दुसरीकडे, iPhone SE 128GB स्टोरेज वेरिएंट 30,999 रुपयांना खरेदी करू शकता. iPhone 13 आणि 13 Pro च्या सेलवरही सूट देण्यात आली आहे. दरम्यान, जर तुम्ही बजेट रेंज स्मार्टफोनच्या शोधात असाल तर फ्लिपकार्ट सेलमध्ये मायक्रोमॅक्स फोन देखील उपलब्ध आहे.
ग्राहक Micromax In 2B 8,499 रुपयांना खरेदी करू शकता. त्याच वेळी, तुम्ही In Note 2 13,499 मध्ये खरेदी करू शकता. Oppo A54 हँडसेट 12,240 च्या ऑफरमध्ये उपलब्ध आहे.