मुंबई – स्मार्टफोन आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्याकडे काही सेकंद स्मार्टफोन नसला की चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. त्यामुळे स्मार्टफोन सावलीसारखा आपल्या सोबत असतो. कुठेही गेलं की आपल्या हातात स्मार्टफोन घेऊन जायला विसरत नाही. अनेकदा फोनची बॅटरी डाऊन झाली की एखाद्या दुकानात किंवा सार्वजनिक ठिकाणी असलेला चार्जिंग पाईंट कामी येतो. पण आता सायबर गुन्हेगारांनी मोबाईल चार्जिंग पॉईंटवर वाकडी नजर टाकली आहे. रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करणं महागात पडू शकतं. चला जाणून काय होऊ शकतं ते…
अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयने नुकतंच लोकांना पॉकेट चार्जर जवळ बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करण्यास मनाई केली आहे. इतकंच काय तर सार्वजनिक ठिकाणचं चार्जिंगमुळे तुमचा मोबाईल हॅक होण्याची भीती आहे.
संपूर्ण प्रकरण जूस जॅकिंगसी निगडीत आहे. सायबर गुन्हेगारी एअरपोर्ट, हॉटेल आणि शॉपिंग मॉल सारख्या सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग पॉईंटच्या माध्यमातून आपलं सावज हेरतात. पब्लिक युएसबी पोर्टच्या माध्यमातून लोकांच्या फोनमध्ये मॅलवेयर आणि मॉनिटरिंग सॉफ्टवेअर इंस्टॉल केलं जातं. त्यानंतर फोन हॅक करून युजर्सचा प्रायव्हेट डेटा चोरला जातो.
एफबीआयने बाहेर जातान आपल्यासोबत पोर्टेबल पॉवर बँक घेऊन जाण्याचा सल्ला दिला आहे. 2021 मध्ये अमेरिकनं कम्यूनिकेशन कमिशननं जूस जॅकिंगचा इशारा दिला होता. यात सायबर गुन्हेगार पब्लिक यूएसबी पोर्टमध्ये सॉफ्टवेअर इंस्टॉल करतात. त्यामुळे तुमचा खासगी डेटा हॅक केला जातो.
असे प्रकार अमेरिकेतच नाही तर भारतातही घडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. त्यामुळे बाहेर जाताना सोबत पॉवर बँक असणं गरजेचं आहे. दुसरीकडे सार्वजनिक फोन चार्ज करताना डेटा ब्लॉकर वापरणं फायद्याचं ठरू शकतं.