मुंबई : शाओमी लवकरच ‘रेडमी के20’ स्मार्टफोन लाँच करणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबद्दल कंपनीने अधिकृत घोषणा अजून केलेली नाही. शाओमीचा रेडमी के20 भारतात नुकताच लाँच करण्यात आलेल्या ‘वनप्लस 7 प्रो’ला टक्कर देईल, असंही सांगितलं जात आहे. सध्या या फोनच्या लाँचिंगची तारीख समोर आलेली नाही. पण लवकरच हा फोन लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे.
गेल्या काही दिवसात रेडमी के 20 फोनच्या फीचरची माहिती लीक झालेली आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा हाय अँड प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 855 दिला आहे. फोनमध्ये अनेक नवीन फीचर दिले आहेत. तसेच हा फोन वनप्लस 7 प्रोला टक्कर देईल, असंही म्हटलं जात आहे.
रेडमी के 20 मध्ये 19.5:9 रेशिओसोबत 6.39 इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 20 मेगापिक्सलचा पॉप अप सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. रिअर कॅमेरामध्ये 48+13+8 मेगा पिक्सल कॅमेरा आहे. 13 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सल कॅमेरा अनुक्रमे अल्ट्रा व्हाईड आणि टेलीफोटो लेन्सवाले आहेत. या फोनमध्ये रेडमी नोट 7 प्रमाणे रेडमी के20 मध्येही 4000mAh बॅटरी दिलेली आहे.
रेडमी के 20 दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. स्टँडर्ड व्हेरिअंट रेडमी के 20 आणि टॉप मॉडल रेडमी के 20 प्रो नावाने लाँच केला जाऊ शकतो. रेडमी के20 प्रो भारतात पोको एफ 2 ला टक्कर देणार आहे, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, ही सर्व माहिती खोटीही असू शकते. फोन लाँच झाल्यावरच खरी माहिती समोर येईल.