मुंबई : या वर्षी विविध स्मार्टफोन कंपन्यांनी अनेक 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत, सोबतच आगामी काळात अनेक कंपन्या 5G स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. या यादीत वनप्लस 9, रियलमी नार्जो 30, सॅमसंग गॅलेक्सी A52 सारख्या अनेक डिवाइसचा समावेश आहे. हे स्मार्टफोन अद्याप भारतात लाँच झालेले नाहीत. परंतु आज आम्ही तुम्हाला 20 हजार ते 35 हजार रुपयांपर्यंतच्या 5 जी स्मार्टफोनबाबतची माहिती देणार आहोत. 5 जी सह या स्मार्टफोन्समध्ये दमदार फीचर्स, मजबूत हार्डवेअर, शानदार कॅमेरा आणि अधिक पॉवरची बॅटरीदेखील आहे. (Best 5G Smartphones Available in India)
या यादीत पहिलं नाव रियलमी X7 या स्मार्टफोनचं आहे. हा फोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 800U 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. रेडमी नोट 9T मध्येदेखील हाच प्रोसेसर देण्यात आला आहे. रियलमी X7 सध्या भारतात उपलब्ध असलेला सर्वात स्वस्त 5 जी फोन आहे. या फोनमध्ये 6.4 इंचांचा फुल HD+ सुपर एमोलेड डिस्प्ले, 64 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच 4310mAh क्षमतेची बॅटरीदेखील देण्यात आली आहे.
या फोनची किंमत 20,999 रुपये इतकी आहे. या फोनचं डिवाइस पावरफुल आहे. शाओमी Mi 10i मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.67 इंचांचा फुल HD + LCD डिस्प्ले आणि 120Hz इतका रिफ्रेश रेट तसेच HDR10+ सपोर्ट देण्यात आला आहे. फोनचा बॅक कॅमेरा 108MP सेंसरसह सादर करण्यात आला आहे. या फोनची बॅटरी 4820mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
वनप्लस नॉर्ड एक मिड रेंज 5G स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये क्वालकॉमचा पावरफुल स्नॅपड्रॅगन 765G SoC देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 6.44 इंचांचा फुल HD+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चं प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. डिवाइसमध्ये 48 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे, सोबत 4115mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
फोनमध्ये फ्लॅगशिप मीडियाटेक डेंसिटी 1000+ प्रोसेसर देण्यात आला आहे. जो 7nm प्रोसेसवर काम करतो. युजर्सना या फोनमध्ये गेम खेळताना कोणतीही अडचण येणार नाही. या फोनमध्ये 6.55 इंचांचा फुल HD+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz च्या रिफ्रेश रेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येतो. या फोनमध्ये HDR10 चा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनचा रियर कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. तर या फोनची बॅटरी 4500mAh क्षमतेची आहे. या फोनची किंमत 29,999 रुपये इतकी आहे.
हेही वाचा
‘रिअल मी’चा 5 जी स्मार्टफोन लवकरच बाजारात, ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक सुविधा मिळणार
बॅन केलेलं TikTok पुन्हा येणार; ‘ही’ भारतीय कंपनी अॅप खरेदीसाठी इच्छूक
भारतात लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, कमी किंमतीत मिळणार हे शानदार फिचर्स
अॅपल वॉचला टक्कर देणार फेसबुकचे स्मार्टवॉच, पुढील वर्षी स्मार्टवॉच बाजारात आणण्याची फेसबुकची योजना
(Best 5G Smartphones Available in India)