सेल्फी कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, 7 हजारांहून कमी किमतीतील Best स्मार्टफोन

| Updated on: Jan 09, 2021 | 11:08 PM

यात तुम्हाला 20 किंवा 25 हजारांच्या फोनमध्ये असणारे बहुतांश फिचर्स मिळू शकतात. (Best Smartphones Under 7000 Rs)

सेल्फी कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, 7 हजारांहून कमी किमतीतील Best स्मार्टफोन
Follow us on

नवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदी करतेवेळी त्याचे फिचर्स, कॅमेरा या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. मात्र त्यासोबतच तुमचा बजेटही महत्त्वाचा असतो. अनेकांना 20 किंवा 25 हजारांचे फोन घेणं परवडत नाही. त्यामुळे काही जण स्मार्टफोन घेण्याबाबत शंभरदा विचार करतात. पण अशा युजर्ससाठी केवळ 7 हजारात चांगले फिचर्स असणारे स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. यात तुम्हाला 20 किंवा 25 हजारांच्या फोनमध्ये असणारे बहुतांश फिचर्स मिळू शकतात. (Best Smartphones Under 7000 Rs)

Micromax In 1B: किंमत 6,999 रुपये

Micromax In 1B या स्मार्टफोनची किंमत 6 हजार 999 रुपये आहे. या फोनचा डिस्प्ले 6.52 इंच इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 with HyperEngine 1.0 processor, 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोनमध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टम आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सल रेअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. त्याशिवाय या मोबाईलची बॅटरी 5000mAh इतकी आहे.

Infinix Smart 4: किंमत 6,999 रुपये

इनफिनिक्स स्मार्ट 4 हा मोबाईल सध्या चांगला ट्रेंडमध्ये आहे. या फोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. या फोनमध्ये Android 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन फक्त 6 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.

Nokia C3 2020

Nokia C3 2020 हा फोन केवळ 6,999 रुपयांना उपलब्ध आहे. या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज मेमरी आहे. हा स्मार्टफोनही Android 10 ऑपरेटिंग सिस्टमवर सुरु होतो. ड्युअल सिम असणाऱ्या या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. या स्मार्टफोन फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.

Tecno Spark Go 2020: 6,799 रुपये

टेक्नो या फोनमध्ये 6.52 इंच एचडी+ स्क्रीन आहे. याचा Aspect Ratio 20:9 इतका आहे. या फोन मध्ये मीडियाटेक हीलियो ए 25 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सल कॅमेरा आहे. यात 5000mAh इतकी बॅटरी बॅकअप आहे.

Xiaomi Redmi 9A : 6,999 रुपये

Xiaomi या कंपनीचे स्मार्टफोन दीर्घकाळ टिकतात, असे अनेक युजर्सचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे Xiaomi ही स्मार्टफोन कंपनी 7 हजारांच्या आत तुम्हाला चांगले फिचर्स असणारे फोन देत आहे. Xiaomi Redmi 9A या फोनचा डिस्प्ले 6.53 इंच इतका आहे. या फोनमध्ये Android 10 आधारित MIUI 11 या सिस्टम आहे. या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. (Best Smartphones Under 7000 Rs)

संबंधित बातम्या : 

भारतात Samsung Galaxy S21 Series साठी प्री-बुकिंग सुरु, 3,849 रुपयांचं कव्हर मोफत

18 मिनिटात 50 टक्के चार्ज होणार, Realme चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच