X वर पाहा चित्रपट; AI Audience फीचर लवकरच, एलॉन मस्क याने केली घोषणा

| Updated on: May 11, 2024 | 12:21 PM

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आता अजून एक खास फीचर जोडल्या जाणार आहे. युझर्स फिल्म, टीव्ही मालिका आणि पॉडकास्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करु शकतील. तर मोनेटायझेशनच्या (Monetization) माध्यमातून पैसा कमावू शकतील.

X वर पाहा चित्रपट; AI Audience फीचर लवकरच, एलॉन मस्क याने केली घोषणा
आता एक्सवर पाहा चित्रपट
Follow us on

Tesla आणि Space X चे सीईओ एलॉन मस्क याने शुक्रवारी एक मोठी घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) युझर्स चित्रपट, टीव्ही मालिका आणि पॉडकॉस्ट पोस्ट करु शकतील. तर मोनेटायझेशनच्या (Monetization) माध्यमातून पैसा कमावू शकतील. एलॉन मस्क आणि त्याची बहिण टोस्का मस्क या दोघांमधील सोशल मीडियातील संवादातून ही बातमी समोर आली आहे. तिच्या प्रश्नाला मस्क याने उत्तर दिले आहे. त्यात त्याने चित्रपट, टीव्ही मालिका, पॉडकॉस्ट एक्सवर पोस्ट करण्याची माहिती दिली आहे.

शुल्काची लागलीच मागणी

एलॉनची बहिण टोस्काने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आता एक्सवर सुद्धा चित्रपट पाहता येईल, ही चांगली गोष्ट आहे. काही युझर्सने लागलीच विना सब्सक्रिप्शन चित्रपट पाहण्यासाठी युझर्सला वन टाईम शुल्क ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा

एआय ऑडियंस फीचर

याशिवाय एलॉन मस्क त्याच्या फॉलोअर्ससाठी एआय ऑडियन्स हे फीचर पण घेऊन येत आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत लागलीच पोहचू शकता. एआय सिस्टम काही सेकंदात जाहिरातीसाठी मदत करेल. तुमच्या इच्छित ऑडियन्सपर्यत पोहचण्यासाठी मदत करेल.

एक्सवर मोजा पैसा

एलॉन मस्क याने आतापर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले आहे. मस्क युझर्सला झटका देणार आहे. Blue Tick साठी मस्कने अगोदरच युझर्सकडून वसुली सुरु केली आहे. आता पुन्हा एकदा X यूजर्सकडून पैसे वसूल करणार आहे. आता एक्सवरील एखादी पोस्ट लाईक करणे, त्या पोस्टवर रिप्लाय देणे एवढेच नाही तर बुकमार्क करण्यासाठी सुध्दा ग्राहकांचा खिसा कापल्या जाणार आहे. त्यासाठी युझर्सला पैसे मोजावे लागतील.

प्रोढांसाठी कंटेंट

एक्सवर प्रौढ कंटेंटसाठी युझर्स कम्युनिटी तयार करु शकतील. त्यांना सेटिंगमध्ये याविषयीची माहिती लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याविषयीचा स्क्रीनशॉट ॲनालिस्ट Daniel Buchuk यांनी शेअर केला आहे. डॅनिअल ॲप्स विकसाबाबत माहिती जमा करतो आणि त्याविषयी युझर्सला अपडेट देतो. एक्सच्या सेटिंगमध्ये लवकरच साधं कंटेंट तर प्रौढ कंटेंट अशा नामफलक, लेबल लागलेले असेल. ते युझर्सच्या सहज नजरेत येईल.