मुंबई : डिजीटल युगात अनेक अॅप नवनवीन सुविधा घेऊन येत आहेत. मात्र, त्याचवेळी काही अॅपकडून माहितीची चोरी होत असल्याच्या गंभीर घटनाही घडत आहेत. असाच काहीसा प्रकार ट्रुकॉलर (TrueCaller) या लोकप्रिय अॅपबाबत घडला आहे. Truecaller ने आपल्या अनेक युजर्सच्या परवानगीशिवाय युनिफाईड पेमेंट इंटरफेस (Unified Payments Interface – UPI) नोंदणीसाठी SMS पाठवले. त्यामुळे अनेक युजर्सला धक्का बसला असून आपले बँक खाते आणि आर्थिक व्यवहार सुरक्षित आहे की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे.
Thread on how @Truecaller created a UPI ID for me, without my intervention. Maybe @nixxin can help how this could have happened.
Woke up to this message from ICICI Pay on an Android phone that I use only as a wifi hotspot when traveling. pic.twitter.com/yusI1ZYYKY— Aashish Bansal (@Unbelted) July 30, 2019
ट्विटरवर अनेक युजर्सने हा अनुभव शेअर केला आहे. एका युजरने म्हटले, “मी सकाळी उठून माझा अँड्रॉईड फोन तपासला तेव्हा TrueCaller अॅप अपडेट झाले होते. त्यासोबतच इतर काही अॅपही अपडेट झालेले होते. Truecaller ने अपडेटनंतर एका अनोळखी क्रमांकावर एनक्रिप्टेड SMS केला होता. त्यानंतर ICICI बँककडून मला UPI नोंदणी झाल्याचा SMS आला.’ विशेष म्हणजे काही युजरला ICICI बँकेचा UPI नोंदणीचा SMS आला त्यांचे या बँकेत खातेही नाही.
IMPORTANT: Uninstall @Truecaller immediately. They sent an unauthorized SMS from my phone to UPI registration. I repeat, this SMS has gone FROM my inbox. If possible uninstall your @ICICIBank_Care app as well immediately. And of course I’m going to follow up with @NPCI_NPCI pic.twitter.com/LXB9BlGkzO
— Shilpa Rathnam (@shilparathnam) July 30, 2019
TrueCaller ची पेमेंट सर्विससाठी ICICI बँकेसोबत भागीदारी
Truecaller ने त्यांच्या UPI वर आधारित पेमेंट सर्विससाठी ICICI बँकेसोबत भागीदारी केली आहे. त्याचाच भाग म्हणून Truecaller ने युजरच्या परवानगीशिवाय UPI रजिस्ट्रेशन केल्याचा आरोप युजर्सकडून केला जात आहे.
Thread on how @Truecaller is breaching privacy and creating UPI accounts without user’s express consent. Other instances of the same included at the end of the thread. https://t.co/XzSu3pADSH
— Pratik Sinha (@free_thinker) July 30, 2019
हे अनुभव अनेक युजर्सला आले असून त्यांनी याबाबत ट्विटरवर याविषयी सांगितले आहे. हे युजर्स NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ला देखील टॅग करत असून या प्रकाराची दखल घेण्यास सांगत आहेत. तसेच अनेक युजर्सने truecaller अनइंस्टॉल करण्याचाही निर्णय घेतला आहे. काही तज्ज्ञांनीही ही युजर्सची फसवणूक असल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच TrueCaller कडून युजर्सला धोका असल्याचंही नमूद केलं.
TrueCaller कडून बचावात्मक पवित्रा
— Truecaller (@Truecaller) July 30, 2019
TrueCaller ने हा प्रकार समोर आल्यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हे सर्व Truecaller अॅपमधील एका बगमुळे झाल्याचा दावा केला आहे. TrueCaller ने म्हटले, “आम्हाला TrueCaller च्या लेटेस्ट अपडेटमध्ये एक बग सापडला आहे. या बगमुळे पेमेंट फिचरवर परिणाम झाला असून आपोआप UPI ची नोंदणी होत आहे. तो केवळ एक बग होता आणि आम्ही तो काढून टाकला आहे. आता कोणत्याही युजर्सला याचा सामना करावा लागणार नाही. Truecaller अॅपचे हे नवे व्हर्जन आमच्या गुणवत्ता निकषांनुसार नसल्याने आम्हाला याबद्दल खेद आहे. आता आम्ही हा बग काढून Truecaller अॅपचे एक नवे अपडेट व्हर्जन दिले आहे. ज्या युजर्सला या समस्येला तोंड द्यावे लागले त्यांनी हे नवे व्हर्जन अपडेट करावे. युजर्स मेन्यूमध्ये जाऊन UPI डी-रजिस्टर देखील करु शकता.’