नवी दिल्ली : सध्या बाजारात अनेक प्रकारचे इअरफोन उपलब्ध आहेत. त्यात सध्या ब्ल्युटूथ हेडफोनचा ट्रेंड आहे. मात्र, ग्राहकांकडून प्रवासात एकदाच चार्ज करुन भरपूर वेळ चालेल अशा ब्ल्युटूथ हेडफोनची मागणी होते. हीच मागणी लक्षात घेऊन boAt Rockerz 255 Pro+ वायरलेस (ब्ल्युटूथ) इअरफोनचं भारतात लाँचिंग करण्यात आलं. हा इअरफोन एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 40 तास नॉनस्टॉप चालतो. त्यामुळे प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी हा इअरफोन पर्वणीच आहे (Boat Rockerz 255 Pro+ launch in India Know price feature and all ).
या वायरलेस इअरफोनची किंमत 1499 रुपये आहे. हे वायरलेस इअरफोन बोटचे आतापर्यंतचे सर्वात अॅडव्हान्स नेकबँड स्टाईलचे इअरफोन आहेत. यात आयपीएक्स7 वॉटर रेझिस्टन्स आणि क्वालकॉम aptX ब्ल्युटूथ कोडेक सारखे अद्ययावत फिचर आहेत. ग्राहक हे इअरफोन बोटच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा फ्लिपकार्टवर खरेदी करु शकतात. हे नेव्ही ब्ल्यु, ब्लॅक आणि टील ग्रीन या तीन कलरमध्ये उपलब्ध आहेत.
boAt Rockerz 255 Pro+ या इअरफोनमध्ये 10 mm ड्राईव्हर आणि चांगलं संगीत ऐकू येण्यासाठी aptX कोडेकचा उपयोग करण्यात आलाय. या इअरफोनमध्ये 300 mAh ची बॅटरी देण्यात आलीय. हा इअरफोन 50-60 टक्के आवाजावर वापरला तर नॉनस्टॉप 40 तास चालतो, असा दावा कंपनीने केलाय. याशिवाय या इअरफोनमध्ये फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाचाही उपयोग करण्यात आलाय. त्यामुळे फार कमी वेळेत पूर्ण चार्ज होतो. घाईत असताना केवळ 10 मिनिटं चार्जिंग केला तरी तब्बल 10 तास वापरता येतो. या हेडफोनमध्ये स्वेट रेझिस्टंट तंत्रज्ञान वापरण्यात आलं असल्यानं घामामुळे त्याला काहीही होणार नाहीये.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Boat Rockerz 255 Pro+ launch in India Know price feature and all