सोलापूर : सध्या देशभरातील तरुणांना पबजी गेमचं वेड लागलं आहे. या गेमच्या विळख्यात तरुणाई गुरफटत जात (PUBG game side effect) आहे. यामुळे आतापर्यंत अनेक विद्यार्थी आत्महत्येपर्यंत पोहचल्याचा प्रकारही समोर आला (PUBG game side effect) आहे. मात्र सोलापूर रेल्वे स्थानकावर एका 18 वर्षीय तरुण हा प्रत्यक्षात पबजी खेळताना आढळून आला आहे. इतकंच काय या पबजीच्या आहाराने त्यानं त्याचं स्वत:च भानसुद्धा हरवलं आहे. सध्या त्याची वाटचाल एखाद्या मनोरुग्णाप्रमाणे झाली (PUBG game side effect) आहे.
PUBG गेमचे अनेक तरुणांना व्यसन लागलं आहे. सोलापुरातील रेल्वे स्थानकावर एक तरुण मोबाईलवरील पबजी गेम प्रत्यक्षात खेळत आहे. त्याने स्वत:ला सैनिक समजून रेल्वे स्थानकाबाहेर बंदूकीने गोळी मारणे, लपणे, भिंतींनी जाऊन धडकण्याचे हावभाव करत आहे.
हा तरुण नक्की कोण आहे, कोणत्या गावचा आहे याची कल्पना कोणालाच नाही. मात्र मोबाईल गेमच्या वाढत्या वापराचा दुष्परिणाम असल्याचा बोललं जात आहे. अशाच प्रकारे नुकतंच टेंभूर्णी येथील शिवाजी पवार या तरुणाने पुण्यात गोंधळ घातला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचीच पुनरावृत्ती सोलापूर रेल्वे स्थानकावर होताना दिसत (PUBG game side effect) आहे.
वाढत्या डिजीटल गेममुळे मुलांचे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. तसेचे याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आयुष्यावर होताना दिसत आहे. याची प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतली नाही, तर येणाऱ्या काळात तरुणाईवर याचे परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतात. यामुळे पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे.