पायपुसनीवर गणपतीचा फोटो, अमेझॉनकडून हिंदू देवतांचा अपमान

| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

नवी दिल्ली : ट्विटरवर #BoycottAmazon सध्या ट्रेंड करत आहे. यामागचं कारणही तसंच आहे. ई कॉमर्स कंपनी अमेझॉनकडून अशा काही वस्तू विकल्या जात आहेत, ज्यामध्ये हिंदू देवतांचा अपमान करण्यात आलाय. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे अमेझॉनवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जातंय. ग्राहकांकडून अमेझॉनवर बहिष्कार टाकण्यासोबतच संतापही व्यक्त केला जातोय. काही युझर्सने ट्विटर केलेल्या पोस्टनुसार, अमेझॉनने हिंदू देवतांचे […]

पायपुसनीवर गणपतीचा फोटो, अमेझॉनकडून हिंदू देवतांचा अपमान
Follow us on

नवी दिल्ली : ट्विटरवर #BoycottAmazon सध्या ट्रेंड करत आहे. यामागचं कारणही तसंच आहे. ई कॉमर्स कंपनी अमेझॉनकडून अशा काही वस्तू विकल्या जात आहेत, ज्यामध्ये हिंदू देवतांचा अपमान करण्यात आलाय. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे अमेझॉनवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जातंय. ग्राहकांकडून अमेझॉनवर बहिष्कार टाकण्यासोबतच संतापही व्यक्त केला जातोय.

काही युझर्सने ट्विटर केलेल्या पोस्टनुसार, अमेझॉनने हिंदू देवतांचे फोटो पायपुसनीवरही टाकले आहेत. शिवाय हिंदू देवतांचे फोटो असलेले टॉयलेट कव्हर विकले जात आहेत. यामध्ये गणपती, हनुमान आणि महादेवाचे फोटो आहेत.

अमेझॉनचा युझर्सकडून समाचार घेण्यात आलाय. त्यामुळेच #BoycottAmazon ही मोहिम चालवली जात आहे. सोशल मीडियावर ही मोहिम चालवण्यासोबतच अमेझॉन अप अनइंस्टॉल केल्याचे स्क्रीनशॉटही टाकले जात आहेत. शिवाय सर्वांनीच हे अप डिलीट करावं, असं आवाहन केलं जातंय.

अमेझॉनकडून ही चूक होण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तिरंगा असणारी पायपुसनी आणि महात्मा गांधींजींचा फोटो असणारी चप्पल अमेझॉनने आणली होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागल्यानंतर या वस्तू अमेझॉनने हटवल्या होत्या.

https://twitter.com/darshanbhatt22/status/1128936293474414592