नवी दिल्ली | 21 डिसेंबर 2023 : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क याच्या X या सोशल मीडियाने जगभरातील युझर्सला आज धक्का दिला. एक तासाकरीता एक्स डाऊन झाले. एक्सचे सर्व्हर जवळपास अर्धा ते एक तास झोपी गेले. त्यामुळे या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या अनेक युझर्सला ट्विटच करता येत नव्हते. सातत्याने प्रयोग करणाऱ्या मस्कने आपले खाते तर बंद केले नाही ना? अशी शंका अनेकांना वाटून गेली. मस्कने एका वर्षात या मायक्रो सोशल एपवर इतके प्रयोग केले की युझर्सला त्यांच्या खात्याची अजूनही खात्री वाटत नाही. पण नंतर ट्विटर म्हणजे एक्स पुन्हा सक्रिय झाले. त्यावर पोस्ट करता येऊ लागल्या. तेव्हा युझर्स पण सक्रिय झाले. त्यांनी या तांत्रिक बिघडावर मीम्सचा जोरदार पाऊस पाडला.
केव्हा काय झाले
मायक्रोब्लाकिंग साईट X गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमाराला तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाले. वेबसाईट आणि मोबाईलवर एक्सची खाती काही केल्या वापरता येत नव्हती. तुमचं टाईमलाईनवर स्वाग त आहे, इतकाच काय तो प्रेम संदेश ट्विटरकडून झळकत होता. या प्लॅटफॉर्मला सध्या आऊटेजचा सामना करावा लागत आहे. युझर्सला सुरुवातीला हा काय प्रकार आहे, हे कळलेच नाही. त्यांना वाटले त्यांचे खातेच सस्पेंड केले की काय, पण नंतर ट्विटर पुन्हा पूर्ववत सुरु झाले.
एक्स आऊटेजच्या प्रेमात
एक्स डाऊन होण्याचे प्रमाण अशात वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्यावर्षी ट्विटरचा मस्कने ताबा घेतला होता. त्यानंतर त्याने अनेक बदल केले. ट्विटरचा लोगो, नाव, कार्यालये, कर्मचारी, फर्निचर असा बदलांचा धडकाच मस्क याने लावला. यावर्षी मार्च आणि जुलै महिन्यात डाऊनटाईमचा ट्विटरला सामना करावा लागला. अमेरिका आणि युरोपमध्ये काही महिन्यात तर हा तांत्रिक दोष सतत झाल्याचे पाहायला मिळाले.
X users while twitter was down 😂😂#twitterdown #XDown pic.twitter.com/2eh3uS2XHu
— Anika Singh 🇮🇳 (@AnikaSingh_13) December 21, 2023
पडला मीम्सचा पाऊस
Downdetector च्या आकडेवारीनुसार, 92,000 हून अधिक युझर्सने एक्स का डाऊन झाले याची विचारपूस केली. त्याविषयीची तक्रार केली. सहा टक्के युझर्सने सर्व्हर डाऊन झाल्याची तक्रार दिली. पण एक्स पूर्ववत सुरु झाल्यावर युझर्सने मस्क आणि एक्सची चांगलीच फिरकी घेतली. याकाळात ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला.