मुंबई : सरकार अधिकृत टेलको भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलच्या (BSNL) ब्रॉडबँड युजर्ससाठी एक खुशखबर आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच सध्याच्या ग्राहकांना कायम ठेवण्यासाठी कंपनी आता स्ट्रीमिंग सर्विस देत आहे. या यादीत अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश करण्यात आला आहे. बीएसएनएलने यासाठी यप टीव्हीसोबत भागिदारी केली आहे. कंपनी या ऑफर्स तीन महिन्यांसाठी देत आहे. विशेष म्हणजे यासाठी ग्राहकांना केवळ 129 रुपये मोजावे लागणार आहेत. हा प्लॅन संपल्यानंतर याच प्लॅनसाठी ग्राहकाला दर महिन्याला 199 रुपये मोजावे लागतील. (BSNL broadband customers to get OTT benefits with Cinema Plus plans for Rs 129 per month)
कंपनीने म्हटलंय की, सद्या केवळ एक सिनेमा प्लस प्लॅन उपलब्ध आहे. यप टीव्ही स्ट्रीमिंग सब्सक्रिप्शनच्या मदतीने कोणताही युजर वूट सिलेक्ट (Voot Select), सोनी लिव्ह स्पेशल (Sony Liv Special), झी 5 (Zee5) प्रीमियम ऑल एक्सेस पॅक, यप टीव्ही (Yupp TV) आणि यप टीव्ही मुव्ही अॅक्सेस करु शकतात. विशेष म्हणजे या सर्व्हिससाठी केवळ बीएसएनएल ब्रॉडबँड युजर्सच एलिजिबल आहेत.
बीएसएनएल ही अशी एकमेव दूरसंचार कंपनी आहे जी Disney+ Hotstar चं प्रीमियम सब्सक्रिप्शन देते. कंपनीचा प्रमोशनल ब्रॉडबँड प्लॅन आता 4 एप्रिल 2021 पर्यंत वाढवण्यात आला आहे. 999 रुपये आणि 1499 रुपयांच्या प्रिपेड प्लॅनमध्ये तुम्हाला Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शन दिलं जातं.
नव्या वर्षात (New Year 2021) अन्य टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांना धोबीपछाड देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कंपनी सज्ज झाली आहे. कंपनीने ग्राहकांसाठी शानदार प्लॅन्स सादर केले आहेत. BSNL ने नुकताच नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने 199 रुपयांचा नवा प्लान वाऊचर सादर केला आहे ज्यामध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबीपर्यंत हाय स्पीड डेटा मिळणार आहे.
BSNL च्या या 199 रुपयांच्या प्लॅन वाऊचरमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी हाय स्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळेल. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजरला एकूण 60 जीबी डेटा दिला जातोय. बीएसएनएल कंपनी गेल्या काही दिवसांपासून चांगल्या ऑफर्स सादर करुन जियो, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांना टक्कर देत आहे. या एअरटेल आणि जियोने नुकताच 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सादर केला होता. बीएसएनएलचा प्लॅन त्यांच्यापेक्षा दमदार आहे.
संबंधित बातम्या
आजपासून बदलणार कॉल करण्याचा नियम, आता ‘0’ लावल्याशिवाय नाही लागणार फोन
Airtel आणि Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL चा नवा प्लॅन, दुप्पट डेटा मिळणार
Jio, Airtel आणि Vi ला टक्कर देण्यासाठी BSNL चा ढासू प्लॅन लाँच
(BSNL broadband customers to get OTT benefits with Cinema Plus plans for Rs 129 per month)