BSNL Holi Offer: ‘या’ प्लॅनमध्ये 425 दिवस अनलिमिटेड कॉलिंग आणि मिळणार अनेक सुविधा

| Updated on: Mar 12, 2025 | 6:15 PM

तुम्ही जर बीएसएनएल वापरकर्ता असाल तर तुम्हाला ही माहिती तुमच्यासाठी आहे. होळीच्या आगमनापूर्वी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने ग्राहकांसाठी एक उत्तम प्लॅन सादर केला आहे. ज्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त वैधता आणि फायदे दिले जात आहेत. चला तर मग जाणुन घेऊयात...

BSNL Holi Offer: या प्लॅनमध्ये 425 दिवस अनलिमिटेड कॉलिंग आणि मिळणार अनेक सुविधा
Follow us on

भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत, जे सणानिमित्त त्यांच्या ग्राहाकांसाठी प्लॅन लॉंच करत असतात. अशातच होळी येण्याआधीच बीएसएनएल वापरकर्त्यांना होळीची भेट मिळालेली आहे. बीएसएनएल कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त योजना सुरू केली आहे. हा प्लॅन 5 महिने किंवा एक वर्षासाठी नाही तर 425 दिवसांच्या वैधतेसह येतो. याचा अर्थ असा की एका रिचार्जनंतर, तुम्हाला 425 दिवसांपर्यंत कोणत्याही त्रासाशिवाय कॉलिंग आणि डेटाचे फायदे मिळत राहतील.

BSNLचे दीर्घ वैधता असलेले प्लॅन

बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक योजना ऑफर करत असते. कंपनीकडे दीर्घ वैधतेचे अनेक प्लॅन आहेत. यामध्ये 70 दिवस, 150 दिवस, 160 दिवस, 180 दिवस, 336 दिवस, 365 दिवसांसाठी दीर्घ वैधता असलेले प्लॅनचा समावेश आहे आणि आता यामध्ये कंपनीने आणखीन 425 दिवसांसाठी चालणारा प्लॅन देखील जोडण्यात आला आहे. या प्लॅनसह तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळते.

425 दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लॅन

बीएसएनएलचा 2399 रुपयांचा प्लॅन वापरकर्त्यांसाठी अनेक फायदे घेऊन आला आहे. यामध्ये, लोकल आणि STD नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग केली जाऊ शकते. या प्लॅनची चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला या प्लॅनमध्ये ऑफलाइन चॅटिंगचा पर्याय देखील देण्यात आला आहे. याचा अर्थ असा की तुमचे इंटरनेट काम करत नसले तरीही तुम्ही मोफत एसएमएसद्वारे बोलू शकता. यामध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस मोफत मिळत आहेत. तर या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या डेटाचा तुम्ही मनसोक्त आंनद घेऊ शकता. कारण तुम्हाला 425 दिवसांसाठी एकूण 850 जीबी डेटा मिळेल. ज्यामध्ये तुम्ही दररोज 2 जीबी डेटाचा आनंद घेऊ शकाल. ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरेल.

हे सुद्धा वाचा

मर्यादित काळासाठी ऑफर

एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला 31 मार्चपूर्वी रिचार्ज करावे लागेल. ही मर्यादित काळासाठी ऑफर आहे. यानंतर या योजनेत इतके फायदे मिळणार नाहीत. बीएसएनएलचा हा प्लॅन VI आणि एअरटेलला कडक टक्कर देईल. बीएसएनएलचा हा परवडणारा प्लॅन दीर्घ वैधता देतो.