नवी दिल्ली : हल्ली लोक त्यांच्या आरोग्याबद्दल अत्यंत जागरूक होऊ लागले आहेत. त्यांना आपल्या खाण्या-पिण्यापासून आपल्या दिनक्रमाची काळजी सतावत आहे. यासाठी बरेच लोक फिटनेस बँड आणि स्मार्ट वॉचकडे वळत आहेत. बरेच लोक स्वस्त असल्याने फिटनेस बँड खरेदी करतात. तर बरेच लोक केवळ स्मार्ट वॉचलाच प्राधान्य देतात. स्मार्टवॉच आपल्या हृदयाचे ठोके मोजते. आपल्या प्रत्येक क्रियांवर देखील लक्ष ठेवते. हे पोर्टेबल घड्याळ आहे. तथापि, बर्याच कंपन्यांचे स्मार्ट वॉच बरेच महाग आहेत. अशा परिस्थितीत लोक ते खरेदी करताना विचार करतात. मात्र आता स्मार्ट वॉच प्रेमींना चिंता करण्याचे कारण नाही. आता अगदी तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला स्मार्टवॉच बाजारात उपलब्ध झाले आहेत. (Buy a smartwatch now In your budget, know about the features)
ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर ही ऑफर उपलब्ध असून याची किंमत 2,999 रुपये आहे. 33 टक्के सूट देऊन हे वॉच 1,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे कॉल फंक्शनसह येते. यात टचस्क्रीन, नोटिफायर, फिटनेस आणि आऊटडोअर, सेफ्टी आणि सिक्युरिटी आदि वैशिष्ट्ये आहेत. याची बॅटरी 3 दिवस चालते. यासह अन्य काही ऑफर दिल्या जात आहेत. जर अॅक्सिस बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पैसे दिले तर त्यांना 750 रुपयांपर्यंत ऑफ मिळेल. कोटक बॅंकेच्या क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 750 रुपयांपर्यंतच्या ऑफ मिळेल.
हा ऑफरही ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर उपलब्ध असून या वॉचची किंमत 7,999 रुपये आहे. 75 टक्के सूट देऊन हे वॉच 1,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यासह वॉचमध्ये अनेक वैशिष्ट्ये दिली जात आहेत. त्यामध्ये कॉल फंक्शन दिले आहे. हे टचस्क्रीनसह देखील येते. यात नोटिफायर, फिटनेस आणि आऊटडोर, सुरक्षा आणि सिक्युरिटी यासारखी वैशिष्ट्ये आहेत. याची बॅटरी लाईफ 2.5 दिवसांपर्यंत आहे. त्याचा डिस्प्ले अल्ट्रा एचडी आहे.
ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर ही ऑफर उपलब्ध असून याची किंमत 4,999 रुपये आहे. 70 टक्के सूट देऊन ते 1,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यासह यात बरीच वैशिष्ट्ये दिली आहेत, ज्यात कॉल फंक्शन आणि टचस्क्रीन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यात नोटिफायर, फिटनेस आणि आऊटडोर, सुरक्षा आणि सिक्युरिटी यासारखे फिचर्स आहेत.
ही ऑफर ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवर उपलब्ध आहे. याची किंमत 3,999 रुपये आहे. 65 टक्के सूट देऊन हे 1399 रुपयात खरेदी करता येईल. यात कॉलचे फिचर आहे. यात ईसीजी मॉनिटर आणि अॅक्टिव्हिटी ट्रॅकर देखील आहे. यात फुल टच डिस्प्ले आणि हार्ट रेट सेन्सर देखील देण्यात आला आहे. हे पॉवर सेव्हिंग मोडसह येते. हे ब्ल्यूटूथला समर्थन देते. यात पेडोमीटर, स्लीप मॉनिटर, टू-वे सर्च, ब्लूटूथ म्युझिक प्लेबॅक कंट्रोल मोबाईल आदी वैशिष्ट्ये आहेत.
ही ऑफर ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉनवर उपलब्ध आहे. या वॉचची किंमत 4,999 रुपये आहे. 65 टक्के सूट देऊन हे 1,729 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे वॉच 1.75 इंचच्या इनफायनाईट स्क्रीनसह येते. त्यामध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी देखील उपलब्ध आहे. हे एक वॉटर आणि स्पलॅश प्रतिरोधक आहे. हे iOS आणि Android वर कार्य करते. यात पेडोमीटरसारखे वैशिष्ट्य आहे. यात स्लीप आणि हार्ट रेट मॉनिटर देखील आहे. तसेच कॉल फंक्शन देखील उपस्थित आहे. (Buy a smartwatch now In your budget, know about the features)
Marathi Movie : गंभीर विषयावर गमतीशीर चित्रपट, ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलाhttps://t.co/bZ9Mp38epg#MarathiMovie
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 8, 2021
इतर बातम्या
शुन्य टक्के दरानं पीक कर्ज, बाजार समित्यांचं बळकटीकरण, बजेटमध्ये शेतीला काय मिळालं?