1.29 लाखांचा iPhone 10,000 रुपयात खरेदीची संधी, पाहा कुठे मिळतेय ऑफर?

| Updated on: May 13, 2021 | 10:15 PM

Apple iPhone 12 Pro Max हा स्मार्टफोन अमेझॉनवर 1,29,799 रुपये या किंमतीसह सूचीबद्ध आहे, ही किंमत सर्वसामान्यांसाठी खूपच जास्त आहे.

1.29 लाखांचा iPhone 10,000 रुपयात खरेदीची संधी, पाहा कुठे मिळतेय ऑफर?
आयफोनच्या कॅमेर्‍यासाठी अॅपल घेऊन येत आहे खास तंत्रज्ञान
Follow us on

मुंबई : Apple iPhone 12 Pro Max हा स्मार्टफोन अमेझॉनवर 1,29,799 रुपये या किंमतीसह सूचीबद्ध आहे, ही किंमत सर्वसामान्यांसाठी खूपच जास्त आहे. परंतु हा फोन तुम्ही केवळ 10,000 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. कारण, आम्ही तुम्हाला एका जबरदस्त ऑफरची माहिती देणार आहोत. हा अ‍ॅपलचा लेटेस्ट स्मार्टफोन असून यात मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. अ‍ॅपल आयफोन 12 प्रो मॅक्समध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. स्क्रीन संरक्षणासाठी कंपनीने यामध्ये सिरेमिक शील्डचा (Ceramic Shield) वापर केला आहे. (Buy Apple Iphone 12 Pro Max in just 10000 rupees on OLX)

अ‍ॅपलने या स्मार्टफोनमध्ये ए 14 बायोनिक चिप वापरली आहे, जी आतापर्यंतची सर्वात वेगवान स्मार्टफोन चिप आहे. या आयफोनला 15 तासांपेक्षा जास्त व्हिडिओ प्लेबॅक मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. हा फोन मेगासेफ अ‍ॅक्सेसरीजला सपोर्ट करतो. जेणेकरून वायरलेस चार्जिंग सिस्टमसह फोन वेगाने चार्ज होईल. या आयफोनला फेस आयडी सपोर्टदेखील आहे, ज्याच्या मदतीने फोन पटकन अनलॉक होईल.

जबरदस्त कॅमेरा

iPhone 12 Pro max च्या बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 12 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जो वाइड अँगल लेन्स आणि f/1.6 अपर्चरसह येतो. या व्यतिरिक्त, यामध्ये 12 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे, जो अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि अपर्चर f/2.4 सह येतो. या फोनमधील तिसरा कॅमेरादेखील 12 मेगापिक्सलचाच आहे. यात लो लाइटमध्ये अधिक चांगला ऑटोफोकस, शानदार फोटोग्राफी आणि ऑगमेंटेड रियलिटी (AR) साठी LiDAR स्कॅनरचा समावेश करण्यात आला आहे.

कुठे मिळतेय ऑफर

Phone 12 Pro max हा स्मार्टफोन OLX वर लिस्टेड आहे. OLX ही सेकेंड हँड वस्तू खरेदी-विक्रीसाठीची प्रसिद्ध वेबसाईट आहे. या वेबसाईटवर Phone 12 Pro max 10,000 रुपये इतक्या किंमतीत विकला जात आहे.

टीप : ओएलएक्स वरून कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी फोनची पूर्णपणे तपासणी करा. त्याचे पोर्ट तपासून पाहा. गरज वाटल्यास फोन एकदा चार्ज करुन पाहा. तसेच फोन अॅपलच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन दाखवा. कारण ओएलएक्सवरुन फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे याआधी समोर आली आहेत.

संबंधित बातम्या

22 हजारांचा फोन 6,999 रुपयांत, 16 हजारांचा फोन 8 हजारात, OPPO ची ढासू ऑफर

अवघ्या 1 रुपयात OPPO Band खरेदीची संधी, स्मार्टफोन्सवर 80% डिस्काऊंट, कुठे मिळतेय ऑफर?

iPhone 12 सिरीजवर तगडा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर